एक थेंब अधिक पीक योजनेसाठी अर्ज मागविले शिबिरांचे आयोजन

 एक थेंब अधिक पीक योजनेसाठी अर्ज मागविले

शिबिरांचे आयोजन

अकोला, दि. ६ : राष्ट्रीय कृषी विकास योजना एक थेंब अधिक पीक योजनेत अनुसूचित जाती व अनु. जमाती प्रवर्गासाठी जिल्ह्याचा लक्ष्यांक २ कोटी २१ लक्ष रू. आहे. अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

 

अधिकाधिक अर्ज प्राप्त करून घेण्यासाठी कृषी विभागातर्फे गावपातळीवर मोहिम हाती घेण्यात आली असून, शिबिरांचेही आयोजन करण्यात आले आहे.

अनुसूचित जातीसाठी २ कोटी व अनु. जमातीसाठी २१ लाख असा एकूण २ कोटी २१ लक्ष रू. लक्ष्यांक आहे. या प्रवर्गातील अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना अनुक्रमे २५ टक्के आणि इतर शेतक-यांना ३० टक्के पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून देण्यात येईल. उर्वरित १० टक्के व १५ टक्के अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषीक्रांती योजनेतून अदा करून ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

सूक्ष्म सिंचन घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना या घटकासाठी अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.   

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा