अकोट येथे वसतिगृहासाठी जागेचा शोध

 

 अकोट येथे वसतिगृहासाठी जागेचा शोध

अकोला, दि. 24 : सामाजिक न्याय विभागाच्या अकोट येथील मागासवर्गीय तथा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी जागेचा शोध सुरू आहे.

त्यासाठी सुस्थितीतील इमारत, किमान 8 हजार चौ. फु. चटई क्षेत्र असावे. 8 स्नानगृहे, 8 स्वच्छतागृहे, 80 पलंग सुव्यवस्थित ठेवता येतील. गृहपालाची राहण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, पाण्याची पुरेशी व्यवस्था अशा पद्धतीचे बांधकाम असलेली इमारत असल्यास किमान 3 वर्षांचा इमारत करार मालकासोबत करण्यात येईल. इच्छूकांनी मुलींचे शासकीय वसतिगृह, पोपटखेड रस्ता, अकोट येथे संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन