शेतकरी बांधवांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी महसूल प्रशासनाचे आवाहन
शेतकरी बांधवांनी
ॲग्रीस्टॅक नोंदणी करून घ्यावी
महसूल प्रशासनाचे
आवाहन
अकोला, दि.
10 : ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही ॲग्रीस्टॅक नोंदणी केली नसेल, त्यांनी ती तत्काळ
करून घेण्याचे आवाहन महसूल उपजिल्हाधिकारी निखील खेमनार यांनी केले आहे.
कृषी, पशुसंवर्धन,
दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने दि. १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार
सर्व शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या
आहेत.
अॅग्रीस्टॅक
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सप्टेंबर २०२५ मधील अतिवृष्टी व पुरामुळे
नुकसान झालेली रक्कम तात्काळ जमा करण्यात येत आहे. अॅग्रीस्टॅक नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना
ई- केवायसी करण्याची आवश्यकता नाही.
त्यामुळे अद्यापही
ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला गाव नमूना
क्र. ७/१२ उतारा व आधारपत्रासह आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली अॅग्रीस्टॅक नोंदणी
करुन शेतकरी ओळख क्रमांक प्राप्त करुन घ्यावा, असे अकोला जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात
आले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा