संविधान दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त २७५ जात वैधता प्रमाणपत्राचे ऑनलाईन प्रणालीद्वारे वाटप

 

अकोला, दि. 27 : भारतीय संविधानाला २६ नोव्हेंबर २०२५ रोजी ७५ वर्ष पूर्ण झाली असून २६ नोव्हेंबर हा दिवस आपण संविधानाचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला आहे. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी अकोला येथे करण्यात आले आहे.
तसेच सामाईक परिक्षा २०२५ नुसार निकाल जाहिर झालेला आहे. सामाईक परिक्षेनंतर उच्च शिक्षण व व्यावसायिक अभ्यासक्रमानुसार प्रवेश निश्चित करण्यासाठी ११ वी, १२ वी, विज्ञान शाखेतील नविन प्रवेशीत असलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याकरिता विद्यार्थी यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, अकोला या कार्यालयात आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रासह परीपुर्ण असलेली प्रकरणे सादर करण्यात आलेले होते. अशा विद्यार्थ्यांना संविधान दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त समितीने निर्णय घेऊन एकूण २७५ जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन पध्दतीने या कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आले आहे.
संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकाचे सामुहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य अमोल यावलीकर उपस्थित राहून त्यांनी भारतीय संविधानावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी गिरीष पुसतकर उपस्थित होते. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अभिजीत काळे व प्रमुख वक्ते मुंबई हायकोर्ट अॅड. सचिन माहोकार व प्रकल्प अधिकारी समातदुत बार्टी श्री. बेदरकर इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी