पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम - कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा ‘एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त



 पत्रकारांसाठी ‘एआय’चे प्रशिक्षण कौशल्यवर्धनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

-         कौशल्य, रोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

एआय’ मुळे पत्रकारिता अधिक तंत्रज्ञानयुक्त

 

मुंबईदि १३ : जगभरात आता विविध क्षेत्रात एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमाने क्रांती घडत असून प्रसिद्धी माध्यमातही याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. एआय’ तंत्रज्ञान अत्याधुनिक पत्रकारितेला नवा पैलू देत असून यामुळे पत्रकारांचा अमूल्य वेळ ही वाचणार आहे. प्रत्येक क्षेत्रात अपस्किलींगला खूप महत्व आहे हे लक्षात घेवून राज्यात असा नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य विकास विभागाने राबविला असल्याचे कौशल्य, रोजगारउद्योजकता न नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

         रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यान आले. तिसऱ्या दिवशीच्या सत्रात एआय’ तंज्ञानाच्या वापरासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्राला कौशल्य मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकरएआय तज्ज्ञ किशोर जस्नानी,उपकुलसचिव राजेंद्र तलवारेमंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटेसरचिटणीस दिपक भातोसे तसेच प्रिंट,इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमांचे पत्रकार यावेळी या प्रशिक्षणाला उपस्थित होते.

मंत्रालय आणि विधिमंडळ संघाच्या सदस्य पत्रकारांनी या प्रशिक्षण कार्यशाळेला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अत्याधिक आनंद झाला असल्याच्या भावना यावेळी कौशल्य विकास मंत्री लोढा यांनी व्यक्त केली. नवनवीन तंत्रज्ञान आल्यानंतर नेहमीच मनुष्यबळासंदर्भात चर्चा होते. मात्र या तंत्रज्ञानाने अधिकाधिक रोजगार उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. पत्रकारांना या कार्यशाळेचा दैनंदिन कामकाजात नक्कीच अधिक उपयोग करता येईल तसेच कामामध्ये अधिक तंत्रस्नेहीपणे काम करता येईल, असे कौशल्य मंत्री

       मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे सरचिटणीस दिपक भातोसे यांनी कौशल्य,रोजगारउद्योजकता न नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून चार दिवसीय एआय प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट असून या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पत्रकारांना नक्कीच उपयोग होणार असल्याचे सांगितले.

प्रभावी बातमी लेखनासाठी ‘एआय’ टूल्स उपयुक्त

-कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्नानी

मुंबईदि १२ :  कृत्रिम बुद्धिमत्ता (एआयसाधनांचा प्रभावी वापर करून बातमी लेखनाची गुणवत्ता अधिक वाढविता येते. यासाठी या टूल्सना योग्य सूचना देणे आवश्यक आहे. एआय साधने ही  कामाची गती आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी आहेतअसे मत एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी यांनी मांडले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. तिसऱ्या दिवशीच्या सत्रात एआय तज्ज्ञ किशोर जस्नानी यांनी एआय ट्रल्सला योग्य सूचना देण्याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर इंग्रजीचे मराठी भाषांतरशीर्षक लेखनसंभाषण विश्लेषण आणि प्रॉम्प्ट लेखन याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

किशोर जस्नानी यांनी सांगितले कीइंग्रजीचे मराठी भाषांतरासाठी "जेमिनी" हे टूल्स मराठी भाषेसाठी उत्तम असून ते अचूक व सहज भाषांतर देते.

बातमी लेखनात ५डब्लू आणि १एच (व्हूव्हॉटव्हेनव्हेअरव्हाय आणि हाऊयांचे भान ठेवून प्रॉम्प्ट तयार करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

शीर्षक लेखनाबाबत त्यांनी स्पष्ट केले कीएका बातमीसाठी विविध प्रकारची शीर्षके तयार करता येतात. यात छापील आवृत्तीचे शीर्षकडिजिटल माध्यमासाठीचे शीर्षकसर्च इंजिनसाठी अनुकूल शीर्षकत्वरित लक्षवेधी शीर्षक या प्रकारांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले."डीपसीक" हे टूल्स शीर्षक तयार करण्यासाठी प्रभावी असल्याचे त्यांनी नमूद केले.

आयडिओग्राम लिओनार्ड जेमिनी या एआय टूल्स मधून उत्तम चित्र निर्मिती करता येते. रेकार्ड संभाषणातून मुद्दे व तपशील टंकलिखित करण्यासाठी ऑटर एआय या साधनांचा वापर करण्यासंदर्भात प्रात्यक्षिक त्यांनी दिले. एखाद्या संभाषणात व्यत्यय असल्यास तो दूर करुन ते संभाषण योग्य पद्धतीने ट्रान्सक्राईब करण्याबाबतही त्यांनी प्राम्प्टसह मार्गदर्शन केले.

 

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा