जिल्ह्यातील 2 लक्ष 42 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 191 कोटी मदत जमा
अकोला दि. 20 : जिल्ह्यात जुन ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टी नुकसान मदत व शेतकरी अनुदान वाटपांतर्गत जिल्ह्यातील 2 लक्ष 42 हजार 335 शेतकऱ्यांच्या खात्यात 191 कोटी 7 लक्ष 7 हजार निधी डीबीटी पोर्टलद्वारे जमा करण्यात आले.
जुन ते ऑक्टोबर दरम्यान अतिवृष्टी, आपत्तीच्या अनुषंगाने शासनातर्फे मदत जाहीर करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी वेळोवेळी बैठका घेऊन शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळण्यासाठी जलद कार्यवाही राबविण्यात निर्देश दिले. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे पंचनाम्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना मदत प्राप्त झाली आहे.
अकोला तालुक्यात 41 हजार 71 शेतकऱ्यांच्या खात्यात 34 कोटी 67 लक्ष 44 हजार, तसेच अकोट तालुक्यात 37 हजार 366 शेतकऱ्यांच्या खात्यात 32 कोटी 92 लक्ष 78 हजार, बाळापूर तालुक्यात 37 हजार 448 शेतकऱ्यांच्या खात्यात 28 कोटी 48 लक्ष 38 हजार निधी जमा झाला आहे.
बार्शिटाकळी तालुक्यात 29 हजार 148 शेतकऱ्यांच्या खात्यात 25 कोटी 14 लक्ष 11 हजार, निधी, मुर्तीजापूर तालुक्यात 42 हजार 685 शेतकऱ्यांच्या खात्यात 26 कोटी 58 हजार, पातूर तालुक्यात 24 हजार 749 शेतकऱ्यांच्या खात्यात 20 कोटी 78 लक्ष 92 हजार व तेल्हारा तालुक्यात 29 हजार 868 शेतकऱ्यांच्या खात्यात 23 कोटी 4 लक्ष 86 हजार निधी जमा झाला आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा