‘वंदे मातरम'ची सार्ध शताब्दी पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन
‘वंदे मातरम'ची सार्ध शताब्दी
पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या
उपस्थितीत ‘वंदे मातरम’चे सामूहिक गायन
अकोला, दि. 7 : वंदे मातरम गीतरचनेच्या
सार्ध शताब्दीनिमित्त हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सामूहिक वंदे मातरम गायनाचा
कार्यक्रम राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या
उपस्थितीत आज झाला.
येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या
प्रांगणात ‘वंदे मातरम' रचनेच्या सार्ध शताब्दीनिमीत्त राष्ट्रीय गीताचे सामूहिक गायन
झाले. यावेळी पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल,
शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. गजानन पुंडकर, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ. रामेश्वर भिसे आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी, युवकांबरोबरच
ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रारंभी
पालकमंत्र्यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले.
देशाचे पहिले कृषीमंत्री भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पालकमंत्र्यांनी
पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हजारो विद्यार्थ्यांच्या मुखातून वंदे मातरमचे सूर
निनादले.
यावेळी स्वदेशीची शपथही घेण्यात
आली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा