कृषि समृद्धी योजनेत चिया लागवडीसाठी अर्ज करा प्रत्येक तालुक्यात 535 शेतक-यांना लाभ मिळेल ‘एसएओं’चे आवाहन

 

 

कृषि समृद्धी योजनेत

 चिया लागवडीसाठी अर्ज करा

              प्रत्येक तालुक्यात 535 शेतक-यांना लाभ मिळेल

                              ‘एसएओं’चे आवाहन

        अकोला, दि. 7 : जिल्ह्यात चिया लागवड क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने

कृषी समृद्धी योजनेत चिया लागवडीसाठी प्रत्येक तालुक्यातील ५३५ शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यात एकूण ३ हजार ७४५ शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

या योजनेचिया पीक प्रात्याक्षिकासाठी प्रकल्प खर्चाच्या ६० टक्के मर्यादेत प्रोत्साहनपर अनुदान (६ हजार रू. प्रतिएकर) इतके असेल. एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त २ हेक्टरपर्यंत लाभ घेता येईल. सहाय्यक कृषि अधिका-यांमार्फत शेतकऱ्यांनी लागवड केल्याचे प्रमाणपत्र व लागवडीचा जिओ टॅग फोटो अनुदान मिळण्यासाठी बंधनकारक राहील.

 

लाभासाठी विहित अर्ज केलेला असावा. शेतकरी ओळखपत्र, सातबारा / ८ अ अनिवार्य,तालुका कृषी अधिकारी यांचे पूर्वसंमती पत्र आवश्यक आहे.                                  

 

चिया पिकाचे क्षेत्र वाढवणे आणि उत्पादन क्षमता सुधारणा करणे, तंत्रज्ञान-संवर्धीत शेती पद्धती वापरून उत्पादनाची गुणवत्ता टिकवणे, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे सामुहिक कार्य व बाजार व्यवस्थेत सुधारणा करणे अशी योजनेची उद्दिष्टे आहेत.

 

जिल्ह्यातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी चिया लागवडीसाठी १५ डिसेंबरपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.      

 

              

                                   ०००                                          

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा