भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज करण्याचे आवाहन

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. १२ : शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र मात्र, विद्यार्थी क्षमतेअभावी प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील इयत्ता ११ वी, १२ वी, तसेच त्यापुढील  व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबवली जाते. पात्र विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  

योजनेद्वारे विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते. विभागाच्या होस्टेल मॅनेजमेंट सिस्टीम (https://hmasscrutinyworkflow.mahait.org) संकेतस्थळावर दि. ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षात वसतिगृहासाठी अर्ज केलेला असणे आवश्यक आहे. प्रवेश क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेले विद्यार्थी स्वाधार योजनेकरिता पात्र असतील.  तालुका स्तरावरही स्वाधार योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुख्यत्वे तालुक्याचे ठिकाणी महाविद्यालय असलेल्या व तेथे प्रवेशित तालुक्यातील विद्यार्थी सुध्दा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अपवाद - विद्यार्थी स्थानिक रहिवासी नसावा. अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा