निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करावा कोषागाराचे आवाहन
निवृत्तीवेतनधारकांनी
हयातीचा दाखला सादर करावा
कोषागाराचे
आवाहन
अकोला,
दि. 12 : जिल्हा कोषागारामार्फत निवृत्तीवेतन घेणा-या सर्व निवृत्तीवेतनधारक,
कुटुंब निवृत्तीवेतनधारक, माजी आमदार तसेच इतर सर्व राज्य शासकीय
निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या बँकेत जाऊन विहीत नमुन्यात
हयात प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करावी, असे आवाहन जिल्हा कोषागाराने केले आहे.
पेन्शनरांच्या
संबंधित बँकेत विहीत नमुन्यातील हयात प्रमाणपत्र यादी उपलब्ध आहे. सर्व राज्य
शासकीय निवृत्तीवेतनधारकांनी उपलब्ध यादीमध्ये आधारकार्ड क्रमांक, पॅन कार्ड
क्रमांक, दुरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक नोंदविणे अनिवार्य आहे. त्याशिवाय डिसेंबर
2025 चे निवृत्तीवेतन देय होणार नाही.
ज्या
निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना वयाची 80 वर्षे पूर्ण झाले आहेत व
निवृत्तीवेतनात 20 टक्के व अधिक वाढ मिळाली नाही, त्यांनी तत्काळ जन्म दाखला,
पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँकखाते असलेल्या बँक शाखा प्रमुखांचे
प्रमाणपत्र, शासकीय,निमशासकीय आस्थापनेचे प्रमाणपत्र, सेवापुस्तकातील नोंद,ओळखपत्र,
सेवानिवृत्त झालेल्या कार्यालय प्रमुखांचे प्रमाणपत्र, वाहन परवाना, भारतीय जीवन
विमा कंपनी अथवा अन्य विमा कंपनी यांच्याकडील पॉलिसी आदी यापैकी एक पुरावा तसेच
बँक पासबुकाची झेरॉक्स यासह निवृत्तीवेतन शाखा, कोषागार कार्यालय येथे अर्ज करावा,
असे जिल्हा कोषागार अधिकारी मा.ब. झुंजारे यांनी कळविले आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा