पंतप्रधान यशस्वी यांच्या नेतृत्वाखाली "ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण

 पंतप्रधान यशस्वी यांच्या नेतृत्वाखाली "ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण


भारत सरकार सामाजिक न्याय विभागामार्फत इयत्ता ९ वी ते ११ वी वर्गात शिकणा-या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न एकुण २.५ लक्ष पेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांचे अर्ज सदर योजनेंतर्गत शिष्यवृत्ती मिळण्याकरिता नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर (https://scholarships.gov.in) भरण्याबाबत सुचना देण्यात याव्यात. असे निर्देश प्राप्त आहेत. अकोला जिल्ह्यातील २०१ शाळांची व ८७ कनिष्ठ महाविद्यालय निवड करण्यात आली असुन ३१ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणा-या गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने केंद्र शासनाच्या OBC, EBC आणि DNT प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी PM यशस्वी Top Class Education in School शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत इयत्ता ९ वी ते १० वी वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांना वार्षिक ७५०००/- तर ११ वी च्या विद्यार्थ्यांना १२५०००/- आर्थिक मदत दिली जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर https://scholarships.gov.in या वेबसाईटवर दिनांक ३१ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरवयाचे आहेत. अर्जासोबत जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, गुणपत्रक, शाळा प्रवेश प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील आणि पासपोर्ट फोटो, अपलोड करणे अनिवार्य आहे. पात्र विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज करुन सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अकोला हे करीत आहेत.

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना