पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कवी प्रशांत असनारे यांना शासनाचा बालकवी पुरस्कार प्रदान

    कवी प्रशांत असनारे यांना शासनाचा बालकवी पुरस्कार प्रदान अकोला, दि. २८ :   अकोल्याचे कवी प्रशांत असनारे यांना ‘मोराच्या गावाला जाऊया’ या बालकवितासंग्रहासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईत गुरूवारी झालेल्या शासकीय समारंभात बालकवी पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ५० हजार रू., मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गेट वे ऑफ इंडिया परिसरात हा कार्यक्रम झाला. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे आदी उपस्थित होते.   श्री. असनारे यांचे 'मीच माझा मोर ', ' वन्स मोर ' आणि      'मोराच्या गावाला जाऊया' (बालकुमार कवितासंग्रह) हे संग्रह प्रसिद्ध झाले असून, नाशिकचा विशाखा पुरस्कार ,   इचलकरंजीचा इंदिरा संत पुरस्कार , विदर्भ साहित्य संघाचा शरच्चंद्र मुक्तिबोध पुरस्कार अशा एकूण ११ राज्यस्तरीय पुरस्कारांनी या संग्रहांना गौरविण्यात आले आहे. 'मीच माझा मोर' या सं...

विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा

  विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा अकोला, दि. २८ : राज्याच्या वस्त्रोद्योग विभागातर्फे अमरावती व नागपूर विभागातील हातमाग विणकर बांधवांसाठी विभागीय हातमाग कापड स्पर्धा घेण्यात येत असून, त्यासाठी दि. ५ मार्चपर्यंत कापडाचे तयार नमुने सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्कृष्ट हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देऊन विणकरांना गौरविण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येते. नागपूरच्या वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातर्फे मार्च महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. इच्छूकांनी दि. ५ मार्चपर्यंत प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग, प्रशासकीय इमारत क्र. २, आठवा माळा, बी विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे तयार कापडाचे नमुने सादर करावेत. अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाशी (०७१२) २५३७९२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. ०००

चिखली व कादवी गावात पाणलोट यात्रेचे स्वागत आमदार हरिश पिंपळे यांची उपस्थिती

इमेज
  चिखली व कादवी गावात पाणलोट यात्रेचे स्वागत आमदार हरिश पिंपळे यांची उपस्थिती अकोला, दि. २८ : मृद व जलसंधारण विभागातर्फे मूर्तिजापूर तालुक्यातील चिखली व कादवी गावात पाणलोट यात्रेचे गुरूवारी उत्साहात स्वागत झाले.     आमदार हरिश पिंपळे यांच्या हस्ते चिखली येथे पाणलोट रथाचे पूजन व हिरवी झेंडी दाखवून यात्रेला प्रारंभ झाला. जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सचिन वानरे, मंगेश काळे, सरपंच किशोर राऊत, व्ही. बी. मडावी, राजेश गोरे, वर्षा पुंड आदी उपस्थित होते. गावे जलसमृद्ध होण्यासाठी जलसंधारण आवश्यक आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार श्री. पिंपळे यांनी केले. यात्रेनिमित्त आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेचे बक्षीसवितरण, तसेच पाणलोट योद्धा व धरिणीताई यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सानेगुरूजी कला व सांस्कृतिक बहु. मंडळाचे विशाल राखोंडे, सुखदेव उपर्वट, प्रकाश इंगोले, सिद्धार्थ इंगळे, गजानन आवटे, कैलास शिरसाठ, गणेश देवकर, प्रज्ज्वल भाजीपाले, रवी कढोणे यांनी वासुदेव व गोंधळी वेशभूषेत लोककला सादर केली. मृद व ज...

पारधी व फासेपारधी समाजाच्या गरजूंना अर्थसाह्य

  पारधी व फासेपारधी समाजाच्या गरजूंना अर्थसाह्य अकोला, दि. २८ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे पारधी व फासेपारधी समाजाच्या गरजू व्यक्तींनी विविध योजनांच्या लाभासाठी दि. १० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. योजनेत पारधी समाजाच्या दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना १०० टक्के अनुदानावर शेळीपालनासाठी ५ शेळ्या व १ बोकड खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य दिले जाते. त्याचप्रमाणे, कुकरीज (डीनर सेट) व्यवसायासाठीही १०० टक्के अनुदान मिळते. योजनेचा अर्ज आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे. अर्जासोबत पारधी, फासेपारधी जमातीचा दाखला प्रमाणपत्र, आधारपत्र, बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड, दारिद्र्यरेषेचे कार्ड किंवा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, शिधापत्रिका, पासपोर्ट आकारातील छायाचित्रे, दिव्यांग असल्यास तसे प्रमाणपत्र, परितक्त्या, विधवा असल्यास तसे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ०००

माजी सैनिकांना नोंदणी करण्याचे आवाहन

  माजी सैनिकांना नोंदणी करण्याचे आवाहन अकोला, दि. २८ : सैनिक कल्याण विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. १ एप्रिलपासून संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी, अवलंबित यांनी दि. ३१ मार्चपूर्वी नोंदणीकृत व्हावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.   विभागातर्फे सर्व संबंधित माहितीचे संगणकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही सेवेसाठी यापुढे www.ksb.gov.in आणि   www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधितांनी किमान १ एमबी क्षमतेत कागदपत्रे अपलोड करावीत. कार्यालयाद्वारे दिलेले ओळखपत्र गरजेचे असून, छायाचित्र, आधारपत्र, पॅनकार्ड, सैन्य सेवापुस्तकाची सर्व पाने, पीपीओ, ईसीएचएस कार्ड, पॅशन बँक पासबुक, शैक्षणिक प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. अधिक माहितीसाठी ०७२४-२४३३३७७ या क्रमांकावर संपर्क साधावा. ०००

अल्पसंख्याक उमेदवारांना प्रशिक्षणासाठी इच्छूक संस्थांनी अर्ज करावेत नियोजन कार्यालयाचे आवाहन

  अल्पसंख्याक उमेदवारांना प्रशिक्षणासाठी इच्छूक संस्थांनी अर्ज करावेत नियोजन कार्यालयाचे आवाहन अकोला, दि. २७ : अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांना समान संधी, शासकीय सेवेत, तसेच पोलीस दलात निवड होण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उमेदवारांना निवासी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण देऊ इच्छिणा-या संस्थांनी जिल्हा नियोजन अधिका-यांकडे तत्काळ अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. किमान २५ ते कमाल ५० प्रशिक्षणार्थींना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षेसाठी प्रशिक्षण देण्याची सुविधा संस्थेकडे असावी. विद्यार्थ्यांकडून गणित, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी भाषा यासह शारिरीक चाचणीसाठी सराव करून घेणे अपेक्षित आहे. त्यासाठी अनुभवी प्रशिक्षक असावेत. ग्रंथालय, वाचनालय, स्वच्छतागृहे, ५० प्रशिक्षणार्थींसाठी निवास खोल्या, मैदान, महिला उमेदवारांसाठी स्वतंत्र- सुरक्षित व्यवस्था आदी बाबी असणे आवश्यक आहे. ५० प्रशिक्षणार्थींसाठी निवास, अभ्यास साहित्य, प्रशिक्षण, अल्पोपहार, भोजन आदींसाठी १२ लक्ष २ हजार ५०० रू. अनुदान अनुज्ञेय आहे. त्यानंतर २५ टक्के अनुदान दोन महि...

लोकशाही सभागृहात साजरा होणार मराठी भाषा गौरव दिन

  अकोला, दि. २६ : जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात उद्या दि. २७ फेब्रुवारी रोजी दु. ४ वाजता मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ’मराठी भाषा संवर्धन काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रम होणार आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त शासनातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ०००

गावांच्या समृद्धीसाठी जलसंवर्धन आवश्यक - एसडीओ अनिरूद्ध बक्षी

इमेज
गावांच्या समृद्धीसाठी जलसंवर्धन आवश्यक -         एसडीओ अनिरूद्ध बक्षी अकोला, दि. २५ : जलसंवर्धनातूनच सिंचन व कृषी उत्पादकता वाढेल. खेडीपाडी समृद्ध होतील. त्यामुळे गावोगाव पाणलोट व्यवस्थापन व्हावे, असे आवाहन बाळापूरचे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी केले.   श्री. बक्षी यांच्या हस्ते पाणलोट यात्रेचे पातूर तालुक्यातील पिंपरडोळी येथे सोमवारी स्वागत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सरपंच गंगासागर ताजने, अनिलबाबा देशमुख, नायब तहसीलदार श्री. तेलगोटे, राम ठोके, श्री. वानरे, बी. आर. इंगळे आदी उपस्थित होते. प्रारंभी जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून प्रभातफेरी काढण्यात आली. यानिमित्त निबंध व चित्रकला स्पर्धेतील गुणवंतांना बक्षीसवितरण झाले. रूक्मिणी स्वयंसहायता गट, वैष्णवी स्वयंसहायता गट, संघर्ष स्वयंसहायता गट यांचे स्टॉलही यात्रेनिमित्त लावण्यात आले. पथनाट्याद्वारे जनजागृती, वृक्षारोपण करण्यात आले. पाणलोट योद्ध्यांचा सत्कारही यावेळी झाला. ०००  

महिलाभगिनींच्या श्रमातून ‘माविम’च्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर - जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर

इमेज
महिलाभगिनींच्या श्रमातून ‘माविम’च्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर -         जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर अकोला, दि. २७ : महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार वाटचाल करत आहे. ५० वर्षापूर्वींच्या या रोपट्याचा आता महावृक्ष झाला असून, त्यामागे खेड्यापाड्यातील महिलाभगिंनीचे परिश्रम आहेत, असे प्रतिपादन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी आज येथे केले.   ‘माविम’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम मलकापूर येथील स्व. लोभाजी आप्पा गवळी मंगल भवनात आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे, बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर आदी उपस्थित होते . श्री. पुसदकर म्हणाले की, महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी स्वतंत्र बाजारपेठ विकसित होणे आवश्यक आहे. गटांनी लोणची, पापड, मसाला आदी उत्पादनांपुरते मर्यादित न राहता बाजारपेठेचा वेध घेऊन नवनवी उत्पादने आणावीत. उत्पादनांच्या ब्रॅडिंगसाठी प्रयत्न करावेत. श्री. पवार यांन...

नियमित लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा - अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी

इमेज
  नियमित लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा -         अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी अकोला, दि. २५ : नियमित लसीकरणात समाविष्ट सर्व रोगप्रतिबंधक लसींचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी आज येथे दिले. नियमित लसीकरण टास्क फोर्सच्या बैठक अति. जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, मनपा वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. श्री. सिद्धभट्टी म्हणाले की,   क्षयरोग , डिप्थीरिया,   डांग्या खोकला ,   धनुर्वात ,   पोलिओमायलाईटिस ,   गोवर ,   हिपॅटायटीस बी ,   अतिसार , जपानी एन्सेफलायटीस, एमआर,   न्यूमोनिया   आणि न्यूमोकोकल रोग आदींच्या लसी लसीकरणात समाविष्ट आहेत. बहुतेक लसींचे लसीकरण ८० टक्क्यांवर झाले आहे. तथापि, उर्वरित अल्प कालावधी लक्षात घेता ते तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले. बीसीजी, पोलिओ व हिपॅटायटिस बी लसीकरण हा बाळाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. खासगी रूग्णालयांत हे ...

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना अर्थसहाय्य आधार संमती सादर करण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत

          कापूस   व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना   अर्थसहाय्य   आधार संमती सादर करण्याची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत              अकोला, दि. २४ : सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टर मर्यादेत प्रति हे. ५ हजार रू. मदत देण्यात येत आहे. पात्र शेतक-यांनी आधार संमतीसह नाहरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारीपूर्वी कृषी सहायकाकडे सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले. खरीप २०२३ मध्ये   ई-पीक पाहणी केलेले कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी , ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद   केली नाही तथापि, सातबारा उताऱ्यावर पीकाची नोंद आहे असे खातेदार ,   खरीप २०२३ कापूस, सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत. पात्र शेतक-यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्याबाबत खातरजमा www.scagridbt.mahait.org या पोर्टलवर किंवा संबधित कृषी सहाय्यक यांच्याकडून करुन घ्यावी, तसेच ज्या शेतकऱ्यांनी   खरीप २०२३ मध...

खेडोपाडी बचत गटांचे जाळे विणणा-या ‘माविम’चा सुवर्णमहोत्सव

इमेज
खेडोपाडी बचत गटांचे जाळे विणणा-या ‘माविम’चा सुवर्णमहोत्सव   अकोला, दि. २४ : महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त १९७५ मध्ये करण्यात आली. खेडोपाडी बचत गटांचे जाळे विणणा-या ‘माविम’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून, जिल्ह्यात ४५ हजारहून अधिक भगिनी बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत.   महिलांच्या सर्वांगीण विकासाचे महत्व व महामंडळाची या कामातील वाटचाल लक्षात घेऊन शासनाने २० जाने वारी २००३ रोजी महामंडळाला महिला विकासाची राज्यस्तरीय शिखर संस्था म्हणून घोषित केले आहे. महामंडळातर्फे जिल्ह्या त २९१ गावात गाव विकास समितीची स्थापना करण्यात आली असून , ४ हजार ४२० महिला बचत ग टां ची निर्मिती करण्यात आली आहे . त्यात २ हजार ३४९ ग्रामीण व २ हजार ७१ शहरी गट आहे त, अशी माहिती महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी दिली.   खेड्यापाड्यातील २५ हजार ११ व शहरांतील २१ हजार ४३९ गरीब व गरजू महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. गरीब, गरजू, घट स्फोटित, परितक्त्या , विधवा , वंचित महिलांना गटांमुळे आधार मिळाला आहे . जिल्ह्यात ...

पाणलोट यात्रेचे बटवाडीत जल्लोषात स्वागत

इमेज
पाणलोट यात्रेचे बटवाडीत जल्लोषात स्वागत अकोला, दि. २४ ; गावशिवारातील पाण्याच्या व्यवस्थापनाविषयी विधायक संदेश व मार्गदर्शन करणा-या पाणलोट यात्रेचा बडवाडी बु. येथे रविवारी शुभारंभ झाला. गावक-यांकडून यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावातील आबालवृद्धांनी पाणलोट यात्रेला हजेरी लावून जल व्यवस्थापनाची माहिती घेतली. प्रारंभी जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांकडून प्रभातफेरी काढण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध व चित्रकला स्पर्धा यानिमित्त घेण्यात आल्या होत्या. त्यातील गुणवंतांना बक्षीसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती आखरे होत्या. पाणलोट प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करणा-या पाणलोट योद्ध्यांना यावेळी गौरविण्यात आले. यावेळी वृक्षारोपण आणि मृद व जलसंधारणाची शपथही घेण्यात आली. पथनाट्य पथकाद्वारे माती, पाण्याचे महत्व विशद करण्यात आले. जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, सचिनकुमार वानरे, राजेश गिरी, राम ठोके, श्री. वनारे यांच्यासह ग्रामसेवक, गावातील नागरिक, महिला बचत गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.      दि. 24 रोजी पातूर तालुक्यातील जांब व पिंपळडोळी...

संत गाडगेबाबा यांना ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात अभ‍िवादन

इमेज
  अकोला , दि . 23 : संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे अभिवादन कार्यक्रम झाला . अधीक्षक शिवहरी ठोंबरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . प्रशांत देशमुख हरीश बोदडे व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले .

जिल्ह्यात २७ हजार ४१३ व्यक्तींना घरकुल मंजुरीपत्रांचे वितरण प्रत्येक गरजू व्यक्तीला हक्काचे घर मिळवून देऊ - पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

इमेज
जिल्ह्यात २७ हजार ४१३ व्यक्तींना घरकुल मंजुरीपत्रांचे वितरण प्रत्येक गरजू व्यक्तीला हक्काचे घर मिळवून देऊ - पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर अकोला, दि. २२ : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुस-या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीपत्र, तसेच २१ हजार ६२७ लाभार्थ्यांना पहिल्या हप्ता मिळाला आहे. अद्यापही ज्यांना घर नाही अशा जिल्ह्यातील प्रत्येक गरजू व्यक्तीला आवास योजनेतून हक्काचे घर मिळवून देऊ, अशी ग्वाही राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.    राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण, १० लाख व्यक्तींना पहिला हप्ता वितरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे येथील राज्यस्तरीय कार्यक्रमात झाले. पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय ‘गृहोत्सव’- कार्यक्रमात जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात मंजुरीपत्र वितरण झाले. सिव्हील लाईन येथील जि. प. संविधान सभागृहात हा कार्यक्रम झाला. खासदार अनुप धोत्रे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, विका...

बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना पुरस्कार

इमेज
बाल हक्क संरक्षण आयोगातर्फे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना पुरस्कार अकोला, दि. २१ : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाद्वारे ‘बालस्नेही पुरस्कार-२०२४’अंतर्गत उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कारासाठी अमरावती विभागातून अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची निवड झाली आहे. आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशीबेन शाह यांनी ही निवड जाहीर केली.   मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दि. ३ मार्च रोजी कार्यक्रमात जिल्हाधिका-यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, गृह राज्यमंत्री योगेश कदम, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहतील. जिल्ह्यात बाल हक्क सप्ताहानिमित्त अनेक उपक्रम राबविण्यात आले. महिला व बालविकास भवन, वन स्टॉप सेंटरसाठी जागा मिळविणे, १०९८ स्टीकर्सवाटप, महिला राज्यगृहातील २ अनाथ विद्यार्थिनींना अभय केंद्रात कंत्राटी नोकरी, बालगृहातील बालकांना आवश्यक सुविधांची पूर्तता, बाल हक्क व मतदार जनजागृती तसेच बालविवाहाला प्रतिबंधासाठी सर्वंकष प्रयत्न करण्यात...

जिल्ह्यात २७ हजार ४१३ व्यक्तींना घरकुलाचा लाभ पालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी मंजुरीपत्रांचे वितरण

  जिल्ह्यात २७ हजार ४१३ व्यक्तींना घरकुलाचा लाभ पालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी मंजुरीपत्रांचे वितरण अकोला, दि. २१ : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या दुस-या टप्प्यात जिल्ह्यातील २७ हजार ४१३ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत प्रातिनिधीक स्वरूपात ‘गृहोत्सव’- मंजुरीपत्र वाटपाचा कार्यक्रम उद्या, दि. २२ फेब्रुवारी दु. ३.३० वा. सिव्हील लाईन येथील जि. प. संविधान सभागृहात होणार आहे.     केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण, १० लाख व्यक्तींना पहिला हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रमात होईल. त्याचे प्रक्षेपण जिल्हास्तरीय कार्यक्रमात केले जाणार आहे. तालुका स्तरावर पंचायत समिती सभागृहात आमदार व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत, तसेच ग्रामपंचायत स्तरावर सरपंच यांच्या अध्यक्षतेत मंजुरीपत्र वितरण कार्यक्रम होणार असून, राज्यस्तरीय कार्यक्रमाचे प्रक्षेपणही केले जाणार आहे. लाभार्थी व अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहण्...

अकोल्यात सोमवारी २६२ पदांसाठी रोजगार मेळावा

 अकोल्यात सोमवारी २६२ पदांसाठी रोजगार मेळावा अकोला, दि. २१ :  जिल्ह्यातील उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा कौशल्य विकास व रोजगार केंद्रातर्फे अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सहकार्याने पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा दि. २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे.                                                                                                                                                                                                      ...

साहित्य परिषदेची घटना साकारणारे अकोल्याचे साहित्य संमेलन

इमेज
  दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त अकोल्यात झालेल्या सातव्या साहित्य संमेलनासंबंधीच्या काही आठवणी… साहित्य परिषदेची घटना साकारणारे अकोल्याचे साहित्य संमेलन   महाराष्ट्रातील साहित्यिक चळवळीला दिशा देणा-या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेला मूर्त रूप अकोला येथे १९१२ मध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात मिळाले. इ. स. १९०९ चे मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे झाले. त्यानंतर इ. स. १९१० व १९११ या वर्षी संमेलन होऊ शकली नाहीत. असा खंड पडू नये यासाठी अकोला येथील सामाजिक चळवळीचे धुरीण, साहित्यिक व प्रबोधनकार वि. मो. महाजनि यांनी पुढाकार घेतला आणि पुढे तो सिद्धीसही आला. वि. मो. महाजनि हे स्वत: पुणे येथे १९०७ मध्ये झालेल्या पाचव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.   व-हाड प्रांताची विद्या- परिषद १९१२ मध्ये अकोला येथे भरणार होती. त्यानिमित्त अकोल्यात महाराष्ट्राची साहित्य परिषद भरवावी, असा विचार प्रबोधनकार महाजनि यांनी मांडला. त्याकाळी बहुतेक दरसाल प्लेगची साथ ठरलेलीच असे. तसे घडू शकते अशी चिंता होतीच. मात्र, सुदैवाने संमेलनाचा योग आलाच.  ...

तुतारीचे सूर, श्री शिवछत्रपतींच्या जयजयकाराने निनादले आसमंत ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेत अकोलेकरांचा उत्स्फूर्त सहभाग

इमेज
  तुतारीचे सूर, श्री शिवछत्रपतींच्या जयजयकाराने निनादले आसमंत ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेत अकोलेकरांचा उत्स्फूर्त सहभाग अकोला, दि. १९ : तुतारीचे आसमंत निनादणारे सूर, ढोल, तालबद्ध लेझीम, मशाल, शिवचरित्रातील रोमहर्षक प्रसंग दर्शविणारे देखावे, घोडे, छत्र चामरे, बालशिवाजीचे रूप घेऊन, तसेच मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी झालेले चिमुकले अशा उत्साहपूर्ण वातावरणात शहरात आज ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली.         छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वसंत देसाई क्रीडांगणापासून जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या या पदयात्रेत शेकडो अकोलेकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा व शिवगीत सादर केले. त्यानंतर महाराष्ट्र गीत सादर झाले.     तुतारीच्या निनादात मशाल पेटवून छत्रपती शिवरायांचा जयजयकार करत पदयात्रेचा आरंभ झाला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त सुनील लहाने,...