शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी ‘महाडीबीटी’वर तत्काळ अर्ज करा - समाजकल्याण सहायक आयुक्तांचे आवाहन

 

 

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी ‘महाडीबीटी’वर तत्काळ अर्ज करा

-        समाजकल्याण सहायक आयुक्तांचे आवाहन

अकोला, दि. 7 : सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात.

त्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त एम. डब्ल्यू, मून यांनी केले.

 

 

भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी,परीक्षा फी, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहेत.

चालू शैक्षणिक  वर्षात अर्ज नोंदणी करण्यासाठी प्रथम इन्स्टिट्यूट प्रोफाइल जसे शिक्षण शुल्क व इतर आवश्यक माहिती अद्यावत करण्यासाठी त्याचप्रमाणे, प्रथम वर्षाचे  आणि नूतनीकरणाचे अर्ज नोंदणीकृत करण्यासाठी कार्यप्रणाली सुरू आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज नोंदणीकृत करावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

गत शैक्षणिक वर्षातील अर्ज पुन्हा करण्यासाठी दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालय स्तरावर अद्यापही १ हजार २४७ अर्ज प्रलंबित असल्याचे दिसून येते. यापूर्वी कार्यालयाकडून महाविद्यालयांना कळवूनही अर्ज प्रलंबित असणे ही बाब गंभीर आहे. महाविद्यालयांनी प्रलंबित अर्जांची तपासणी व पडताळणी करून तसेच अर्जाची त्रुटींची पूर्तता करून तात्काळ फॉरवर्ड करावी. तसेच,  

सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घ्यावेत. त्यासाठी महाविद्यालयीन फलकांवर सूचना आणि मार्गदर्शन कार्यशाळा घ्याव्यात जेणेकरून एकही मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहणार नाही. तशी दक्षता संबंधित प्राचार्यांनी घ्यावी, असे आवाहन श्रीमती मून यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज