अकोला पश्चिम मतदारसंघात ‘स्वीप’अंतर्गत जनजागृती

 

अकोला पश्चिम मतदारसंघात ‘स्वीप’अंतर्गत जनजागृती 

अकोला, दि. ८: अकोला पश्चिम मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयातर्फे महाविद्यालयांच्या स्तरावर ‘स्वीप’अंतर्गत जनजागृती सातत्याने शिबिरे घेण्यात येत आहेत.   

शिबिरांच्या या मालिकेत गत काही दिवसांत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, श्री शिवाजी महाविद्यालय, खंडेलवाल महाविद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल महाविद्यालय, कौलखेडचे गुरूदत्त औषधशास्त्र महाविद्यालय आदी ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.

जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार, ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांच्या मार्गदर्शनात जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने सुरू आहे. वैद्यकीय महविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, गुरुदत्त फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन भाजीपाले, आयटीआयचे प्राचार्य आ.श्री. ठोकरे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जगदीश साबू, मोहरादेवी खंडेलवाल महाविद्यालयाचे प्राचार्य रसिका वाजगे यांच्या उपस्थितीत या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आली.

 

नवमतदारांना मतदाराचे अधिकार व कर्तव्य याबाबत जागृत करणे जास्तीत जास्त संख्येने मतदार नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन करण्यात आले. 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज