शासकीय कर्मचा-यांसाठी शुक्रवारी जेम पोर्टलबाबत प्रशिक्षण

 शासकीय कर्मचा-यांसाठी शुक्रवारी जेम पोर्टलबाबत प्रशिक्षण

अकोला, दि. 12 : विविध शासकीय कार्यालयांना खरेदी प्रक्रियेत सहाय्यभूत ठरणारे गव्हर्मेंट ई मार्केटप्लेस (जेम) हे पोर्टल केंद्र शासनाने विकसित केले आहे, त्याबाबतचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत अधिकारी-कर्मचा-यांची कार्यशाळा शुक्रवारी (16 ऑगस्ट) सकाळी 10.30 वा. नियोजनभवनात आयोजिण्यात आली आहे. 

कार्यशाळेत जेम पोर्टलबाबत मुंबई येथील अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. पोर्टलची कार्यपद्धती मानवी हस्तक्षेपाशिवाय असून पूर्णपणे ऑनलाईन असते. त्यामुळे पारदर्शकता निर्माण होते. त्याचा वाढविण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी वेळेत उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज