मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; बँक खात्याला ‘आधार जोडणी’ आवश्यक ॲपवरील अर्जातील त्रुटी तत्काळ दुरूस्त कराव्यात - जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

 

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना;

बँक खात्याला ‘आधार जोडणी’ आवश्यक

ॲपवरील अर्जातील त्रुटी तत्काळ दुरूस्त कराव्यात

-        जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत नारीशक्ती दूत या मोबाईल ॲपवरून अर्ज करणा-यांना त्यांच्या अर्जावरील कार्यवाहीची स्थिती ॲपमध्ये तपासता येते. त्यात काही त्रुटी असल्यास त्या तत्काळ दुरूस्त करून घ्याव्यात, तसेच भगिनींना अर्ज भरण्यासाठी सहकार्य करणा-या यंत्रणांनीही याबाबत पूर्तता करून घ्यावी , असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.   

समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, सचिव, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, प्रभाग अधिकारी, सेतू, बालवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सीएमएम, मदत कक्षप्रमुख यांना ॲपवरील अर्जातील त्रुटींचे निराकरण करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

अर्जाची स्थिती कशी तपासाल?

नारीशक्ती दूत ॲपमधील आपल्या प्रोफाईलला लॉगिन करून ‘यापूर्वी केलेले अर्ज’ या टॅबवर क्लिक करावे. तिथे आपल्याद्वारे सादर केलेल्या संपूर्ण अर्जाची यादी पाहता येईल. त्यात ‘अप्रुव्ह्ड’, ‘डिसअप्रुव्ह्ड’.  ‘पेडिंग’, ‘रिजेक्टेड’ असे शेरे आणि लाभार्थीचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक आदी माहिती दिसेल. तिथे स्थिती ‘डिसअप्रुव्ह्ड’ असेल तर संबंधितांनी सर्व लाभार्थींना संपर्क करून अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण ‘व्ह्यू रिझन’ या टॅबवर  बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. ‘एडिट’चा पर्याय घेऊन चुकीच्या नोंदी दुरूस्त करता येतात व फॉर्म पुन्हा सादर करता येतो. ‘एडिट’ची सुविधा एकदाच वापरता येते.

अकोला जिल्ह्यातील  अशा ‘डिस्अप्रुव्ह्ड’ म्हणजे अंशत: रद्द अर्जांतील त्रुटींची पूर्तता तत्काळ होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधितांनी तत्काळ तशी दुरूस्ती करून घ्यावी जेणेकरून पुढील पडताळणी होऊन पात्र लाभार्थींना तातडीने लाभ देणे सोयीचे होईल व कोणताही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही असे आवाहन श्री. पुसदकर कोलखेडे यांनी केले.

 

बँक खात्याला ‘आधार’ जोडणी आवश्यक

‘मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने’त  अर्जात नमूद बँक खात्याला आधार क्रमांकाची जोडणी आवश्यक आहे. अर्जदारांनी त्याची खात्री करून घ्यावी. बँक खात्याला आधार जोडलेले नसेल तर तात्काळ बँकेत जाऊन जोडून घ्यावे. डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी हे अनिवार्य आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि. 31 ऑगस्टपर्यंत आहे. सर्व पात्र लाभार्थींना जुलैपासून दरमहा पंधराशे रू. लाभ मिळणार आहे. त्यामुळे आधार जोडणीची कार्यवाही तत्काळ करण्याचे आवाहन श्री. पुसदकर यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज