बाळापूर व तेल्हारा तालुक्यातील गोशाळांना आवाहन

 

बाळापूर व तेल्हारा तालुक्यातील गोशाळांना आवाहन

अकोला, दि. 22 : गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेच्या लाभासाठी बाळापूर व तेल्हारा तालुक्यातील पात्र गोशाळांनी दि. 5 सप्टेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे.

पशुधनासाठी चारा, पाणी व निवा-याची सोय, वैरण उत्पादन कार्यक्रम राबविणे या योजनेचा हेतू आहे. गोशाळा नोंदणीकृत व मागील ३ वर्षाचे लेखापरीक्षण व अनुभव आवश्यक. वैरण उत्पादनासाठी व पशुधन संगोपनासाठी स्वमालकीची किंवा नोंदणीकृत भाडेपट्ट्याची किमान 5 एकर जागा आवश्यक. मागणी केलेल्या अनुदानाच्या किमान 10 टक्के खेळते भांडवल आवश्यक. अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज