माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना मिळणार 'विशेष गौरव पुरस्कार'

 

 

माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना मिळणार 'विशेष गौरव पुरस्कार'

अकोला, दि.१२: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून दिवंगत, तसेच माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना 'विशेष गौरव पुरस्कार' देण्यात येणार असून, त्यासाठी दि. 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इयत्ता दहावी व बारावीत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या, तसेच खेळाडु, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य आदी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे अशा माजी सैनिक,दिवंगत सैनिक यांच्या पाल्यांना विशेष गौरव पुरस्काराकरिता निवड केली जाणार आहे, पुरस्काराचे अर्ज कार्यालयात उपलब्ध आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्री विजय पाटील यांनी केले आहे,

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना