संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 हेल्पलाईन

 

संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी 1098 हेल्पलाईन

अकोला, दि. 28 : संकटात सापडलेल्या मुलांच्या मदतीसाठी 1098 ही चाईल्ड हेल्पलाईन सर्व दिवस चोवीस तास सुरू आहे. कुठेही बालक संकटात असल्याचे जाणवताच नागरिकांनी हेल्पलाईनचा वापर करून त्याला मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या शून्य ते अठरा वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीकरिता केंद्र व राज्याच्या महिला व बाल विकास विभागामार्फत चाईल्ड हेल्पलाईन सेवा १०९८ हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्रात  कार्यान्वित आहे. 

या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना २४x७  हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेवू शकते किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. १०९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्त डॉ. नारनवरे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना