महात्मा फुले मागासवर्ग महामंडळातर्फे अजा प्रवर्गातील 100 व्यक्तींना कर्ज देणार

 

महात्मा फुले मागासवर्ग महामंडळातर्फे

अजा प्रवर्गातील 100 व्यक्तींना कर्ज देणार

अकोला दि. 6 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे अनुसूचित जाती अभ्युदय योजनेत यंदा जिल्ह्यात 100 कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे उद्दिष्ट असून, 400 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

बीज भांडवल योजनेत कर्ज मिळण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने महामंडळाकडे अर्ज करता येतील. त्याचप्रमाणे, प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय प्रशिक्षण योजनेत 400 प्रशिक्षणार्थींना संधी देण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज nbrmahapreit.in या संकेतस्थळावर करावा. पात्र व्यक्तींनी तत्काळ अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी केले आहे. महामंडळाचे कार्यालय तापडियानगरात जुन्या मोहन भाजीभांडाराजवळ साठे इमारतीत असून, दूरध्वनी क्रमांक (0724) 2411621असा आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज