जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

 

 

जिल्हा होमगार्ड भरतीसाठी 22 ऑगस्टपासून चाचणी

अकोला, द‍ि. 20 :  जिल्हा होमगार्डमध्ये 148 जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी, शारीरीक व मैदानी चाचणी दि. 22 ते 28 ऑगस्टदरम्यान करण्यात येणार आहे. नोंदणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व इन कॅमेरा पार पडणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. सदस्य नोंदणीकरिता कोणी पैश्याची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांनी केले आहे.

 

ही चाचणी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर होणार असून, उमेदवारांना सकाळी 5 पासून हजर राहण्याच्या सूचना आहेत. अर्ज नोंदणी क्रमांकानुसार 01 ते क्र. 2795  यामधील पुरूष उमेदवारांची चाचणी दि. 22 ऑगस्ट रोजी , क्र. 2797 ते 5644 मधील पुरूष उमेदवारांची चाचणी दि. 23 ऑगस्ट रोजी, नोंदणी क्र. 5645 ते 8555 मधील पुरूष उमेदवारांची चाचणी दि. 24 ऑगस्ट रोजी  आणि क्र. 8556 ते 11 हजार 415 या क्रमांकांमधील पुरूष उमेदवारांची चाचणी दि. 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व महिला उमेदवारांची चाचणी दि. 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. उमेदवारांना प्रत्येक चाचणी प्रकारात 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील, अतिवृष्टी किंवा प्रशासकीय, अपरिहार्य कारणास्तव चाचणीमध्ये बदल झाल्यास त्याची सूचना maharashtracdhg.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणार आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम