मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना : खासगी आस्थापनांची कार्यशाळा योजनेत अधिकाधिक खासगी आस्थापनांनी नोंदणी करावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना : खासगी आस्थापनांची कार्यशाळा

योजनेत अधिकाधिक खासगी आस्थापनांनी नोंदणी करावी

-        जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 26 : मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत उमेदवारांना प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याचे उद्दिष्ट असून, खासगी आस्थापनांनाही मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक आस्थापनांनी या योजनेत नोंदणी करून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.

खासगी आस्थापनाधारक, उद्योजकांची कार्यशाळा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके, कौशल्य विकास अधिकारी ग. प्र. बिटोडे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नयन सिन्हा, उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री. खंडेलवाल आदी यावेळी उपस्थित होते.

नोंदणीची प्रक्रिया सुलभ केली

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, योजनेत अकोला जिल्ह्यात विविध आस्थापनांसाठी साडेचार हजारहून अधिक उमेदवारांची निवड झाली आहे. उद्योगांनी महास्वयम पोर्टलवर नोंदणीसाठी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील वीसपेक्षा जास्त मनुष्यबळ कार्यरत असलेल्या उद्योग, कंपनी, रूग्णालय, महाविद्यालये,अनुदानित, विनाअनुदानित शाळा, हॉटेल्स, बँक, सामाजिक संस्था, मॉल्स आदी खासगी आस्थापनांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. उमेदवारांचे विद्यावेतन शासनाकडून अदा केले जाणार आहे. योजनेमुळे उमेदवार चांगल्या प्रशिक्षणातून रोजगारक्षम होऊन उद्योगांनाही लाभ होणार आहे. त्यामुळे अधिकाधिक उद्योगांनी या योजनेत नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले.   

 सहायक आयुक्त श्री. शेळके यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती, नोंदणी, व इतर ऑनलाईन प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. श्री. बिटोडे यांनी आभार मानले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज