उद्योजकांना मार्गदर्शनासाठी शुक्रवारी कार्यशाळा

 

उद्योजकांना मार्गदर्शनासाठी शुक्रवारी कार्यशाळा

अकोला, दि. 7 : जिल्हा उद्योग केंद्रातर्फे व्यवसाय सुलभीकरण व विविध बाबींबद्दल उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘इग्नाइट महाराष्ट्र- 2024’ ही कार्यशाळा शुक्रवारी (दि. 9 ऑगस्ट) सकाळी 10 वा. मूर्तिजापूर रस्त्यावरील हॉटेल आर. जी. एक्स्क्लुसिव्ह येथे होणार आहे.

उद्योजकता क्षेत्राची कार्यक्षमता, उत्पादकता वाढविणे, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधींत भर घालणे, निर्यातवृद्धीच्या दिशेने प्रयत्न करणे यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती कार्यशाळेच्या माध्यमातून एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार आहे. भांडवलाबाबत सिडबी, तसेच महत्वाच्या वित्तीय संस्थांच्या वित्तपुरवठा उपक्रमांबाबतही यावेळी मार्गदर्शन केले जाईल.

उद्योजक, नवउद्योजक, बँकर्स आदींनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज