पशुधन विभागातर्फे शनिवारी राष्ट्रीय पशुधन कार्यशाळा

 


पशुधन विभागातर्फे शनिवारी राष्ट्रीय पशुधन कार्यशाळा

अकोला, दि. 23 ; पशुसंवर्धन विभागातर्फे राष्ट्रीय पशुधन अभियान प्रशिक्षण कार्यशाळा उद्या (24 ऑगस्ट) सकाळी 10 वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कमिटी हॉलमध्ये होणार आहे.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते कार्यशाळेचा शुभारंभ होईल. जि. प. सीईओ वैष्णवी बी. यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून पशुधन अभियान, डीपीआऱ, ऑनलाईन अर्जपद्धती, पशुधन विमा, चारा व्यवस्थापन, मूरघास निर्मिती, शेळीपालन आदींबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक बांधवांनी कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज