गत खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना अर्थसाह्य ई-पीक पाहणी केलेल्यांना मिळेल मदत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ग्रा. पं. स्तरावर प्रसिद्ध होणार

 गत खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना अर्थसाह्य


ई-पीक पाहणी केलेल्यांना मिळेल मदत

पात्र शेतकऱ्यांच्या याद्या ग्रा. पं. स्तरावर प्रसिद्ध होणार


अकोला, दि. 12 : कृषी विभागाने 2023 मधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रूपये व त्यापुढील क्षेत्रासाठी प्रतिहेक्टर 5 हजार रूपये आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव मान्य केला आहे. त्यात जिल्ह्यातील 2 लाख 16 हजार 420 कापूस उत्पादक आणि 3 लाख 68 हजार 918 सोयाबीन उत्पादक शेतकरी पात्र आहेत. ही एकूण आकडेवारी 5 लाख 85 हजार 338 आहे.

पात्र याद्या ग्रामपंचायतीत पाहता येतील

पात्र शेतकरी बांधवांच्या याद्या तालुका कृषी अधिका-यांकडे सोपविण्यात आल्या असून, ग्रामपंचायतींच्या सूचनाफलकावर लावण्यात येत आहेत. संबंधित शेतक-यांनी तत्काळ कागदपत्रे कृषी सहायकाकडे द्यावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

पोर्टलवर नोंदणी केलेल्यांना मदत
2023 मधील खरीप हंगामात ई-पीक पाहणी, ॲप, पोर्टलवर कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केलेल्या शेतक-यांनाच हे अर्थसाह्य मिळणार आहे. क्षेत्र व त्याप्रमाणात परिगणना करून अर्थसाह्य दिले जाईल. ही योजना केवळ 2023 मधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठीच मर्यादित आहे. 


अकोला तालुक्यातील 34 हजार 782 कापूस उत्पादक व 65 हजार 910 सोयाबीन उत्पादक असे एकूण 1 लक्ष 692, बार्शिटाकळी तालुक्यातील 5 हजार 851 कापूस उत्पादक व 65 हजार 476 सोयाबीन उत्पादक असे एकूण 71 हजार 327, मूर्तिजापूर तालुक्यातील 81 हजार 266 कापूस उत्पादक व 71 हजार 14 सोयाबीन उत्पादक असे एकूण 1 लाख 52 हजार 280 शेतकरी पात्र आहेत.
अकोट तालुक्यातील 51 हजार 727 कापूस उत्पादक व 21 हजार 345 सोयाबीन उत्पादक असे एकूण 73 हजार 72 शेतकरी पात्र आहेत. तेल्हारा तालुक्यातील 24 हजार 352 कापूस उत्पादक व 28 हजार 953 सोयाबीन उत्पादक असे एकूण 53 हजार 305 शेतकरी , बाळापूर तालुक्यातील 14 हजार 476 कापूस उत्पादक व 64 हजार 945 सोयाबीन उत्पादक असे एकूण 79 हजार 421 शेतकरी पात्र आहेत. पातूर तालुक्यातील 3 हजार 966 कापूस उत्पादक व 51 हजार 275 सोयाबीन उत्पादक असे एकूण 55 हजार 241 खातेदार पात्र आहेत. 


संबंधित शेतक-यांनी  तत्काळ कागदपत्रे कृषी सहायकाकडे द्यावीत. वैयक्तिक खातेदारांनी आधारकार्डाची स्वसाक्षांकित प्रत, संमतीपत्र, मोबाईल क्रमांक आणि सामूहिक खातेदारांनी आधारकार्ड स्वसाक्षांकित प्रत, सामूहिक खातेदार नाहरकत प्रमाणपत्र, संमतीपत्र, मोबाईल क्रमांक आदी माहिती द्यावी. 
शासनामार्फत अर्थसाह्य शेतकरी बांधवांच्या आधार जोडणी झालेल्या खात्यावर टाकण्यात येणार आहे. काही अडचण असल्यास कृषी सहायक किंवा कृषी अधिका-यांशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. किरवे यांनी केले.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज