उमेदवार निवडीसाठी ‘एसटी’चा बुधवारी मेळावा

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

उमेदवार निवडीसाठी ‘एसटी’चा बुधवारी मेळावा
अकोला, दि. 12 ; मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत राज्य परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) विभागीय कार्यालयाद्वारे लिपिक- टंकलेखकांच्या 110 आणि यांत्रिक, आयटीआय आदींच्या 40 अशा 150 उमेदवारांची निवड होणार आहे. त्यासाठी उमेदवार निवड मेळावा बुधवारी (14 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता ‘एस.टी’च्या कौलखेड येथील विभागीय कार्यालयात होईल.
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष असून, कोणत्याही शाखेची पदवी, एमएससीआयटी, टायपिंग मराठी 30, इंग्रजी 40, आयटीआय आदी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. हे प्रशिक्षण 6 महिन्यांसाठी असेल. बारावी उत्तीर्ण असल्यास 6 हजार, आयटीआय, पदविकाप्राप्त असल्यास 8 हजार व पदवीधर, पदव्युत्तर अर्हताधारकांना 10 हजार रू. प्रतिमहिना विद्यावेतन दिले जाईल.
कामाची ठिकाणे विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, अकोला येथील दोन्ही आगारे, अकोट, कारंजा, वाशिम, मंगरूळपीर, मूर्तिजापूर, तेल्हारा, रिसोड येथील आगार अशी असतील. इच्छूकांनी प्रत्यक्ष मेळाव्यात सहभागी व्हावे. त्याचप्रमाणे, उमेदवारांना rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करता येईल.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज