विविध कीड आणि रोग नियंत्रणाबाबत कृषी विभागाच्या सूचना

 

 विविध कीड आणि रोग नियंत्रणाबाबत कृषी विभागाच्या सूचना  

अकोला, दि. 12 :  मूग, उडीद, ज्वारी, मका आदी विविध पीकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाने सूचना जारी केल्या आहेत.

 

ज्वारी पिकावर खोड माशीच्या नियंत्रणासाठी २५% प्रवाही क्विनालफॉस @ १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बाजरी व खरीप ज्वारी पिकावरील मिज माशीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३०% ई.सी. @ १० मिली किंवा मॅलेथिऑन ५०% ई.सी. २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मूग व उडीद पिकात मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी ५% निंबोळी अर्काची किंवा डायमिथोएट @ १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी तसेच मुग व उडीद पिकावरील भुरी रोग नियंत्रणासाठी गंधक (पाण्यात मिसळणारे) ८० डब्ल्यू.पी. @ २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात किंवा कार्बेन्डॅझिम ५० % डब्ल्यू.पी. @ १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्याच्या नियंत्रणासाठी क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ % @ ३ मिली आणि    खोडमाशीच्या नियंत्रणासाठी इंडोक्सीकार्ब १५.८ टक्के एस.सी. @ ७ मि.ली. क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ एससी @ ३ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मका पिकावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी निमअर्क १५०० पीपीएम किंवा निंबोळी अर्क ५% @ ५ मिली किंवा थायोमिथोक्झाम १२.६ % + लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ % झेडसी @ २.५ मीली प्रती लीटर पाण्यात किंवा क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ एससी, ३ मीली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कापूस पिकात रसशोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा अॅसिटामेप्रिड 20% 2 ग्रॅम प्रति 10 लिटर किंवा फ्लोनिकॅमिड ५०% ६० ग्रॅम प्रति एकर पाण्यात मिसळून फवारणी तसेच कापूस पिकात आकस्मिक मर रोग आढळून आल्यास झाडाच्या मुळाशी, कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० डब्लूपी) @ २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० डब्लूपी) @ २ ग्रॅम अधिक युरिया @ १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी.

 

भुईमू पिकावर टिक्का आणि तांबेरा या रोगांच्या नियंत्रणासाठी फ्ल्यूबेनडामाईड ३.५% + हेक्झाकोनॅझोल ५% डब्ल्यू. जी. @ २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी, तसेच

तूर पिकावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड @ २५ ग्रॅम + युरीया @ २०० ग्रॅम + पांढरा पोटॅश @ १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात घेऊन हे द्रावण झाडाच्या मूळाजवळ प्रति झाड १०० मिली पावसाची उघडीप पाहून द्यावे.

 

भात पिकावरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लॅझोल (७५% पाण्यात मिसळणारी भुकटी) @ १० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी, तसेच नाचणी पिकात करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड @ २.५ ग्रॅम किंवा झायनेब @ ४ ग्रॅम प्रती १ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज