देशभक्तीपर गीतांनी निनादला जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत स्वाक्षरी मोहीम

 








अकोला दि १४ : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर देशभक्तीपर गीतांनी निनादून गेला. विविध शाळांच्या चिमुकल्यांनी अनेक गाणी सादर करून वातावरणात चैतन्य आणले.

यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभारजि.मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बीनिवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटीलउपजिल्हाधिकारी अनिल माचेवाडउपजिल्हाधिकारी महेश परांडेकर यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख शहरातील शाळांचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन प्रभात किड्स स्कूलचे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी केलेदेशभक्तीपर गीत सादरीकरण कार्यक्रमांमध्ये स्कूल ऑफ स्कॉलर बिर्ला कॉलनीप्रभात किड्स स्कूलआरडीजी पब्लिक स्कूलश्री समर्थ पब्लिक स्कूल रिधोरापोद्दार इंग्लिश स्कूल,खंडेलवाल इंग्लिश स्कूलखंडेलवाल मराठी शाळास्कूल ऑफ स्कॉलर कौलखेडनोवेल स्कूल अकोला येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमारा हा संदेश देत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी यांनी स्वाक्षरी फलकावर जय हिंद हा संदेश लिहीत स्वाक्षरी केली.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज