होमगार्ड सदस्य नोंदणीच्या तारखांत बदल

 

 

होमगार्ड सदस्य नोंदणीच्या तारखांत बदल

अकोला, दि. 26 : पावसामुळे जिल्हा होमगार्ड सदस्य नोंदणीच्या तारखांत बदल झाला आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी सुधारित तारखांना उपस्थित राहण्याचे आवाहन होमगार्ड कार्यालयाचे केंद्र नायक राजेंद्र शेळके यांनी केले आहे.

यापूर्वी 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान उमेदवारांची चाचणी व कागदपत्र पडताळणी करण्यात येणार होती. आता 28  ते 31 ऑगस्ट दरम्यान या चाचणी होईल.

अर्जदारांच्या अर्जाच्या क्रमांकांनुसार शारीरिक चाचणी व कागदपत्र पडताळणीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व पुरूष उमेदवारांची चाचणी दि. 28 ऑगस्ट (अर्ज क्र. 2797 ते 5644), दि. 29 ऑगस्ट ( क्र. 5645 ते 8555) आणि दि. 30 ऑगस्ट (क्र. 8556 ते 11415) होणार आहे.  सर्व महिला उमेदवारांची चाचणी दि. 31 ऑगस्ट रोजी होणार आहे.

ही चाचणी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर होणार असून, उमेदवारांना सकाळी 5 पासून हजर राहण्याच्या सूचना आहेत.  अतिवृष्टी किंवा प्रशासकीय, अपरिहार्य कारणास्तव चाचणीमध्ये बदल झाल्यास त्याची सूचना maharashtracdhg.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणार आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम