विशेष संक्षिप्त पुनरीक्षणनुसार प्रारूप याद्या प्रसिद्ध मतदारसंख्येत 13 हजार 429 मतदारांची वाढ दि. 20 ऑगस्टपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

 

 

विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानुसार प्रारूप याद्या प्रसिद्ध

मतदारसंख्येत 13 हजार 429 मतदारांची वाढ

दि. 20 ऑगस्टपर्यंत दावे-हरकती दाखल करता येणार

अकोला, दि. 6 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदार याद्यांची प्रारुप प्रसिध्‍दी  जिल्‍हा, उपविभागीय, तसेच तहसील कार्यालये येथे करण्‍यात आली आहे. मतदान केंद्रस्‍तरीय अधिका-यांकडेही प्रारूप यादी उपलब्‍ध आहे. या प्रारूपावर दि. 20 ऑगस्टपूर्वी दावे, हरकती दाखल  करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम मतदार यादी दि. 30 ऑगस्ट रोजी प्रसिध्‍द होईल.

 

                प्रारूप यादीनुसार आता लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 4 एप्रिल 2024 रोजी निश्चित मतदार संख्‍येत एकूण 13,429 इतक्‍या मतदारांची वाढ झाली आहे.

 

 

प्रारूप मतदार यादीनुसार मतदारसंख्या

अ.क्र.

मतदार संघ क्रमांक व नांव

दिनांक 06/08/2024 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या

प्रारुप मतदार यादीनुसार मतदार संख्‍या

पुरुष

स्‍त्री

इतर

एकूण

1

28-अकोट

158043

144151

4

302198

2

29-बाळापुर

156395

145865

1

302261

3

30-अकोला (पश्चिम)

170370

168064

22

338456

4

31-अकोला (पुर्व)

176362

167326

15

343703

5

32-मुर्तिजापुर (अ.जा.)

155819

145872

5

301696

एकूण….

816989

771278

47

1588314

 

                       

सर्व मतदारांनी मतदार यादीची तपासणी करुन सर्व मतदारांनी आपली नावे  समाविष्‍ट असल्‍याबाबत व त्‍यातील तपशील योग्‍य असल्‍याबाबत खात्री करावी. ज्‍या मतदारांची नांवे मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट नाहीत अशा पात्र मतदारांनी आपले नांव नोंदविण्‍यासाठी संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदार नोंदणी अधिकारी/मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे आवश्‍यक पुराव्‍यांसह विहीत नमुना 6 सादर करावा अथवा मा.भारत निवडणूक आयोगाकडून विकसित करण्‍यात आलेल्‍या voters.eci.gov.in या संकेत स्‍थळाचा / voter helpline या App चा ऑनलाईन अर्ज भरण्‍यासाठी वापर करावा.

                        त्‍याचप्रमाणे मयत किंवा कायमस्‍वरुपी स्‍थलांतरीत मतदारांची नांवे वगळणी करणेकरीता विहीत नमुना 7 भरुन द्यावा, मतदारांच्‍या मतदार यादीमधील तपशीलामध्‍ये दुरुस्‍ती करणे, पत्‍ता बदलणे, नवीन मतदार छायाचित्र ओळखपत्र मिळविणे इत्‍यादी साठी आवश्‍यक पुराव्‍यांसह विहीत नमुना 8 मध्‍ये अर्ज संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी / सहा. मतदार नोंदणी अधिकारी/ मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांचेकडे सादर करता येईल.

                        मतदार यादीमध्‍ये नाव समाविष्‍ट असलेल्‍या दिव्‍यांग मतदारांना मा.भारत निवडणूक आयोगाकडून विकसित केलेल्‍या सक्षम ॲपव्‍दारे दिव्‍यांग असल्‍याबाबतची नोंद करता येऊ शकते. याचा उपयोग दिव्‍यांग मतदारांना मतदान केंद्राचे ठिकाणी आवश्‍यक सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍याकरीता होईल. मतदार यादीमध्‍ये नांव समाविष्‍ट असलेल्‍या ज्‍या मतदारांनी त्‍यांच्‍या मतदार यादीमधील नोंदीशी त्‍यांचा आधार क्रमांक संलग्‍न करुन अद्याप सदर नोंदीचे प्रमाणीकरण केलेले नाही, त्‍यांनी विहित अर्ज भरुन मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांचेकडे / तहसिलदार तथा सहा. मतदार नोंदणी अधिकारी अथवा  मतदार नोंदणी अधिकारी यांच्‍या कार्यालयात सादर करावा. सदरची कार्यवाही दिनांक 20/08/2024 पर्यंत करता येईल.

काही मतदार केंद्रांत बदल

                        पुनरिक्षण पुर्व कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरणाच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये मतदान ज्‍या  मतदान केंद्रांवर 1500 पेक्षा अधिक मतदार संख्‍या होण्‍याची शक्‍यता होती अशी मतदान केंद्रे विभागुन नवीन मतदान केंद्रे तयार करण्‍यात आली आहेत, काही मतदान केंद्रांच्‍या इमारतीचे नाव बदलल्‍यामुळे मतदान केंद्रांच्‍या नावामध्‍ये बदल करण्‍यात आला आहे तसेच काही मतदान केंद्रांच्‍या इमारती मोडकळीस/नादुरुस्‍त अथवा वापरण्‍यायोग्‍य नव्‍हत्‍या अशा मतदान अशी मतदान केंद्रे नजीकच्‍या अन्‍य  इमातीमध्‍ये स्‍थलांतरीत करण्‍यात आले आहेत याप्रमाणे कार्यवाही करण्‍यात आली आहे. ज्‍या मतदारांचे मतदान केंद्र बदलले आहे अशा मतदारांना संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी यांचेमार्फत लेखी कळविण्‍यात येणार आहे. मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरणाच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये खालीलप्रमाणे बदल करण्‍यात आलेला आहे-

 

अ.क्र.

मतदार संघ क्रमांक व नाव

मतदान केंद्र सुसुत्रीकरण कार्यक्रमापूर्वी असलेली मतदान केंद्रांची संख्‍या

मतदान केंद्रांचे स्‍थान बदल

मतदान केंद्रांच्‍या नावात बदल

1350 पेक्ष अधिक मतदार संख्‍या झाल्‍याने लगतच्‍या मतदान केंद्रास जोडलेले मतदान केंद्र

नव्‍याने प्रस्‍तावीत मतदान केंद्रांची संख्‍या

एकूण मतदान केंद्रांची संख्‍या

1

2

3

4

5

6

7

8(3+7)

1

28-अकोट

336

15

13

11

10

346

2

29-बाळापूर

340

3

0

0

7

347

3

30-अकोला (पश्चिम)

307

43

0

38

0

307

4

31-अकोला (पूर्व)

351

11

0

6

0

351

5

32-मुर्तिजापूर (अ.जा.)

385

9

0

8

5

390

एकूण

1719

81

13

63

22

1741

 

                        रिता 1 जुलै 2024 या दिनांकास वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या अकोला जिल्‍ह्यातील सर्व नागरीकांनी मतदार यादीमध्‍ये नाव नोंदणी करावी, कोणताही पात्र व्‍यक्‍ती मतदार यादीमध्‍ये नांव समाविष्‍ट करण्‍यापासून वंचित राहू नये असे आवाहन जिल्‍हाधिकारी अजित कुंभार केले आहे.

 

 ००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज