जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योगांचा विस्तार शक्य कृषी उद्योगवृद्धीसाठी नवउद्योजकांनी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी अजित कुंभार




‘इग्नाइट महाराष्ट्र- 2024’ कार्यशाळेचा शुभारंभ

 

जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योगांचा विस्तार शक्य  

कृषी उद्योगवृद्धीसाठी नवउद्योजकांनी पुढाकार घ्यावा

-        जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 9 : राज्याच्या वार्षिक सकल उत्पादनात जिल्ह्याचा वाटा केवळ 1.17 टक्के असून, तो वाढण्यासाठी विविध उद्योगांचा विस्तार होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग विस्ताराची शक्यता व संधी असून, नवउद्योजक व उद्योजकांनी त्यादिशेने पावले उचलावीत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

जिल्हा उद्योग केंद्रातर्फे व्यवसाय सुलभीकरण व विविध बाबींबद्दल उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘इग्नाइट महाराष्ट्र- 2024’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. उद्योग उपसंचालक रंजना पोळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड, युनिव्हर्सल एक्सपोर्टचे प्रवीण वानखडे, निर्यात मार्गदर्शक अंकित गुप्ता, ध्रुव पारेख, ‘एनआयए’चे मुख्य व्यवसाय व्यवस्थापक आनंद अमृतकर, कामगार सहायक आयुक्त भास्कर लोंढे, टपाल खात्याचे उपअधिक्षक एस एम हिवराळे, नाबार्ड अधिकारी श्रीराम वाघमारे, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, भगवंत अनवणे, प्रसन्न रत्नपारखी आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील जिल्ह्याचा वाटा वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. आता उद्योग-व्यवसायांतील वार्षिक उलाढाल 36 हजार कोटी रू. आहे. त्यात वाढ होण्यासाठी कृषी उद्योगाचा विस्तार करताना नव्या निर्यात संधींचाही शोध घेतला पाहिजे. कृषी उद्योग, फळप्रक्रिया आदींसाठी शासन व बँकांतर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ नवउद्योजकांनी घ्यावा. मूर्तिजापूर एमआयडीसीमध्येही विकासाच्या शक्यता आहेत. येथील उत्तम महामार्ग, रेल्वे संपर्क चांगला आहे. विमानतळ विकासासाठी प्रयत्नरत आहोत, असे त्यांनी सांगितले.

 

कार्यशाळेत विविध तज्ज्ञांकडून केंद्र व राज्य शासनाच्या योजना, उद्योग उभारणी, वित्तीय भांडवल, निर्यातसंधी आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उद्योग उपसंचालक श्रीमती पोळ यांनी प्रास्ताविक केले. उद्योग निरीक्षक अंकिता पाचंगे यांनी सूत्रसंचालन केले.

00000000


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज