कावड उत्सवानिमित्त विविध विभागांना जबाबदा-या

 

 

कावड उत्सवानिमित्त विविध विभागांना जबाबदा-या

 

अकोला, दि. 9 : कावड पालखी उत्सव शांततेत व नियोजनबध्द पार पाडण्याच्या दृष्टीने विविध विभागांना जबाबदारी देण्यात आल्या आहेत. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी निर्गमित केला.

 

 गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावर रोषणाई, आपातापा चौकात वॉच टॉवर,फिरते शौचालय, मंदिर परिसरात बांबूचे आवरण, उघड्यावर मांसविक्रीस प्रतिबंध, देवळाच्या परिसरात चप्पल ठेवण्याची व्यवस्था, कावड पालखी मार्गावर, नदीपात्र व पुलाजवळ स्वच्छता, रोषणाईसाठी हॅलोजन व एलईडी, सीसीटीव्ही, पाणीपुरवठा, आवश्यकतेनुसार झाडांच्या फांद्या कापणे आदी जबाबदारी महापालिकेकडे सोपविण्यात आली आहे.

घाटावर स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा,  वाहनतळ, प्रकाशयोजना आदींबाबत गांधीग्राम येथील ग्रामसचिवांना आदेशित करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था, देवळाच्या परिसरात गर्दी नियंत्रणासाठी बांबू बॅरिकेटिंग, रहदारी नियंत्रण, बंदोबस्त आदी जबाबदारी पोलीसांना देण्यात आली आहे. ठिकठिकाणी प्रथमोपचार, आवश्यक औषधपुरवठा, रूग्णवाहिका आदी जबाबदारी आरोग्य विभागाकडे, तर गांधीग्राम येथे बोट, आपत्कालीन सुरक्षा पथकाची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन व महसूल विभागाकडे आहे. रस्ते, पुलाची दुरूस्ती आदींबाबत राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणला आदेश देण्यात आले आहेत.

अकोट तालुक्यात धारगड येथे 19 ऑगस्ट रोजी यात्रेनिमित्त सोयी-सुविधा, बंदोबस्त, रुग्णवाहिका, औषधोपचार सुविधा, स्वच्छता आदींबाबत अकोट उपविभागीय अधिकारी व तेथील सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर, बाळापूर येथील मुख्य रस्ता, अकोला नाका व घृष्णेश्वर मंदिर रस्ता दुरूस्ती, पथदिवे, पेयजल सुविधा आदींबाबत उपाययोजना करण्याचे आदेश तेथील यंत्रणेला देण्यात आले आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा अल्पसंख्याकांनी आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागरूक राहा -राजेश खवले