संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 


संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला, दि. 30 : संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, डोहोर, होलार व मोची आदी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. आर. वटे यांनी केले आहे.

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनानुसार ‘लिडकॉम आपल्या दारीया संकल्पनेतून कार्यशाळा यापूर्वी घेण्यात आली आहे. महामंडळाच्या कर्ज योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी होत आहे. नुकतेच पाच लाभार्थ्यांना कर्जाचे धनादेशही जिल्हाधिका-यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अशा योजनांचा अधिकाधिक पात्र व्यक्तींनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. महामंडळाचे अकोला येथील जिल्हा कार्यालय महसूल कॉलनीत असून, संपर्क क्रमांक (0724) 2450625 असा आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज