शासकीय मूकबधिर विद्यालयात स्वयंपाकी मदतनीसाची भरती

 

शासकीय मूकबधिर विद्यालयात

स्वयंपाकी मदतनीसाची भरती

अकोला, दि. 28 :  शासकीय मूकबधिर विद्यालयात स्वयंपाकी मदतनीस हे पद रोजंदारीवर भरण्यात येणार आहे.त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी दि. 30 ऑगस्टपर्यंत अर्ज विद्यालयात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे विद्यालय अकोला शहरातील मलकापूर परिसरातील महसूल कॉलनीत आहे.  

पदाच्या अटी व शर्तीनुसार हे रोजंदारी स्वरूपाचे काम आहे. सा.बां.विभागाच्या रोजंदारी पत्रकानुसार दरमहा रोजंदारी 26 दिवसांसाठी व नियुक्ती 10 महिन्यांसाठी असेल. सदर पदावर दावा करणार नाही असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. वेतनाशिवाय अन्य कोणतेही आर्थिक लाभ देय नाहीत. इच्छूकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम