दिव्यांगांना मिळणार उपयुक्त साधने; प्रत्येक तालुक्यात मोजमाप शिबीर

 

एक हात मदतीचा, दिव्यांगांच्या कल्याणाचा

दिव्यांगांना मिळणार उपयुक्त साधने; प्रत्येक तालुक्यात मोजमाप शिबीर

अकोला, दि. 6 : जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयातर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी महसूल पंधरवड्यात 'एक हात मदतीचा, दिव्यांगाच्या कल्याणाचा' या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात विनामूल्य मोजमाप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

दिव्यांग सशक्तीकरण विभाग, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत या पथदर्शी प्रकल्प अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या शिबिरात अद्ययावत कॅलिपर्स, कृत्रिम हात-पाय आदी साधने गरजूंना ‘अलिम्को’तर्फे विनामूल्य वितरित केले जाणार आहेत.

 अकोला तालुक्यात 6 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे शिबिर आयोजिण्यात आले. त्याचप्रमाणे, पातूर येथे  7 ऑगस्ट रोजी, बाळापूर येथे 8 ऑगस्ट रोजी, मूर्तिजापूर येथे  9 ऑगस्टला, अकोट येथे 10 ऑगस्ट, तेल्हारा येथे 12 ऑगस्ट, बार्शीटाकळी येथे 13 ऑगस्ट रोजी या सर्व तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती सभागृहात शिबिर होईल.

शिबिरात अस्थिव्यंग प्रवर्गातील लाभार्थ्यांना आधुनिक कॅलिपर्स आणि कृत्रिम हात-पाय मिळण्यासाठी तपासणी व मोजमाप घेतले जाणार आहे. ‘अलिम्को’तर्फे आवश्यक साधनसामग्री, यंत्रणा, कच्चा माल आणि फिरती रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. एस.आर ट्रस्ट, जिल्हा प्रशासनाचे उपक्रमाला सहकार्य मिळाले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज