प्रोत्साहनपर लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

 

प्रोत्साहनपर लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक

जिल्हा उपनिबंधकांचे आवाहन

अकोला,दि. 21 : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ मिळण्यास पात्र ठरलेल्या तथापि, आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतक-यांनी दि. 7 सप्टेंबरपूर्वी आधार प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.

 

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्यातील विविध बँकांमार्फत ३५ हजार ६२७ कर्जखाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी २१ हजार २५९ खात्यांना विशिष्ट क्रमांक प्राप्त आहे. त्यातील २० हजार ७३९ खातेदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले असून, त्यापैकी २० हजार ४८१ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून ८९ कोटी ३७ लक्ष रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे

एकाच वर्षाचे कर्ज असलेले किंवा अटींची पूर्तता न होऊ शकलेले किंवा यापूर्वीच योजनेचा लाभ मिळालेल्या १४ हजार ३१७ लाभार्थ्यांना ‘ऑन होल्ड’ यादीत अपात्र म्हणून दर्शवण्यात आले आहे.

योजनेत पात्र ठरलेल्या व विशिष्ट क्रमांक मिळालेल्या मात्र, अद्यापही आधार प्रमाणीकरण न केलेल्या 514 शेतक-यांनी सोसायटीचे सचिव, सहाय्यक सचिव तसेच बँक शाखांशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण तात्काळ करून घ्यावे, असे आवाहन श्री. लोखंडे यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज