पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेस मुदतवाढ

 

 

पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेस मुदतवाढ

 

अकोला, दि. 21 : इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे पं. दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक अनिता राठोड यांनी केले.

शैक्षणिक सत्र २०२४-२५ मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उच्च शिक्षणाचे द्वितीय, तृतीय, चतुर्थ, वर्षाकरिता ३० सप्टेंबर आणि उच्च शिक्षणाच्या प्रथम वर्षाकरिता १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन अर्जवाटप व स्वीकृती निमवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सुरु आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज