पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकने सादर करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024

 पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकने सादर करण्याची

शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024

नवी दिल्ली, 22 : दरवर्षी  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला  पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. ही प्रथा पुढे नेत यावर्षी ही पद्म पुरस्कारांची  नामांकने, केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्रक्रिया 1 मे 2024 पासून प्रारंभ  झाली असून, नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर  2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकने (https://awards.gov.in).  या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टवर ऑनलाईन सादर केली जातील

 

पद्मविभूषणपद्मभूषणआणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असूनकलासाहित्यशिक्षणक्रीडाआरोग्यसामाजिक कार्यविज्ञान आणि अभियांत्रिकीसार्वजनिक सेवानागरी सेवाव्यापारऔद्योगिकी अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक भारतीय नागरिकवंशव्यवसायस्तरकिंवा लिंगाचा अपवाद न करताया पुरस्कारांसाठी पात्र आहे.

 

सरकार सर्व नागरिकांना स्वत:चे नामांकन करण्यासाठी आणि इतर योग्य व्यक्तींच्या शिफारसी सादर करण्याचे आवाहन करत आहेविशेषत: स्त्रियासमाजातील दुर्बल घटकअनुसूचित जाती-जमातीदिव्यांगआणि निस्वार्थ सेवा देणाऱ्या व्यक्तींच्या शोधासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

नामांकने सादर करतानाव्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याची माहिती 800 शब्दांपर्यंतच्या वर्णनात नमूद करणे आवश्यक असल्याचे  गृह मंत्रालयाने त्यांच्या बातमी पत्रात म्हटले आहे. यासंबंधी अधिक माहिती गृहमंत्रालयाच्या (https://mha.gov.inसंकेतस्थळावर तसेच पद्म पुरस्काराच्या पोर्टलवर (https://padmaawards.gov.inउपलब्ध आहे.

 

**********

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज