जर्मनीत नोकरीच्या विविध संधी इच्छूकांना जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी अकोल्यात भरणार वर्ग

 

 

जर्मनीत नोकरीच्या विविध संधी

इच्छूकांना जर्मन भाषेच्या प्रशिक्षणासाठी

अकोल्यात भरणार वर्ग

अकोला, दि. 20 : जर्मनीमधील बाडेन वुटेमबर्गम या राज्यात सुमारे 10 हजार कुशल मनुष्यबळाची मागणी असून, ती पुरविण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने या राज्याशी सामंजस्य करार केला आहे. त्यासाठी इच्छूकांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देम्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून पाच केंद्रांवर वर्ग चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या प्राचार्य रत्नमाला खडके यांनी आज दिली.           

जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग या राज्यात सुमारे 10 हजार पदांची मागणी आहे. त्यात पारिचारिका, सुरक्षारक्षक, वाहनचालक, वीज कामगार, दंतचिकित्सा सहायक, हॉटेल व्यवस्थापक, स्वयंपाकी, रंगारी, केअरटेकर आदी विविध 30 क्षेत्रांतील पदे भरण्यात येणार आहेत. त्यात कौशल्य असलेल्या व जर्मनीत काम करण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. अशा व्यक्तींना जर्मन भाषेचे प्रशिक्षण दिले जाईल.

पुणे येथील ग्योथो इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलरभवन, तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. प्रशिक्षणानंतर आवश्यक कौशल्याबाबतही स्वतंत्र प्रशिक्षण दिले जाईल.

अकोला जिल्ह्यात जर्मन भाषेचे प्रशिक्षण देण्यासाठी पाच केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर सकाळी व रात्री वर्ग चालतील. प्रशिक्षण विनामूल्य असेल. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळेल. प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक म्हणून काम करण्याची शासकीय व अनुदानित शाळांतील शिक्षकांची इच्छा असेल तर त्यांनाही प्रशिक्षण दिले जाईल. अधिकाधिक युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य खडके यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज