कीटकनाशक फवारणीबाबत मार्गदर्शनासाठी प्रचाररथाचा शुभारंभ

 

कीटकनाशक फवारणीबाबत

मार्गदर्शनासाठी प्रचाररथाचा शुभारंभ

अकोला, दि. 29 : पीकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना आवश्यक उपाययोजनांबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रचाररथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते आज झाला.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा कृषीविकास अधिकारी मिलिंद जंजाळ, कृषी उपसंचालक ज्योती ठाकरे, मोहिम अधिकारी महेंद्र साल्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीश दांडगे, ‘एफएमसी इंडिया’चे शुभम बढे आदी यावेळी उपस्थित होते.

हा प्रचाररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत फिरून शेतक-यांमध्ये जनजागृती करणार आहे. गावोगाव कार्यक्रमांद्वारे फवारणी प्रात्यक्षिक, उपाययोजनांची माहिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे, संरक्षक कीटचे वाटप करण्यात येईल. उपाययोजनांबाबतची भित्तीपत्रके, फ्लेक्स गावोगाव लावले जाणार आहेत, अशी माहिती श्री. जंजाळ यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज