बॅटरीवर चालणा-या फवारणी पंपासाठी अनुदान योजनेला 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 

बॅटरीवर चालणा-या फवारणी पंपासाठी अनुदान

 योजनेला 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 

अकोला, दि. 7 ; एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. त्यात एका योजनेत बॅटरीवर चालणा-या पंपासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते. या योजनेत अर्ज करण्यासाठी दि. 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

कापूस, सोयाबीन व इतर  तेलबिया  आधारित पीक पध्दतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस,सोयाबीन व इतर  तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देणे या उद्देशाने विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. बॅटरी संचलित पंपासाठी 100 टक्के अनुदान मिळते. लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जातून करण्यात येणार आहे.  

कृषी यांत्रिकीकरण या टाईलअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in farmer login या वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावेत व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,  उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा

 

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज