पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

 पात्र विद्यार्थ्यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

 

अकोला, दि.८: सामाजिक न्याय विभागाच्या ‘गुणवंत मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात मातंग, मेहतर व अनाथ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त न झाल्यामुळे अद्यापही त्या जागा रिक्त आहेत. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तत्काळ अर्ज करून वसतिगृहात प्रवेश घ्यावा, असे आवाहन गृहपाल एस. एस. लव्हाळे यांनी केले आहे.

इयत्ता अकरावी, तंत्रविद्यानिकेतन आणि आयटीआयसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जागा उपलब्ध असून, प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.  अकोला महापालिकेच्या हद्दीतील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या किंवा घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी तात्काळ वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करावा. हे वसतिगृह हनुमान वस्तीत संतोषी मातेच्या देवळाजवळ असून, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा दिल्या जातात, असे श्री. लव्हाळे यांनी सांगितले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन