उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

अकोला, दि. 27 : उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" व" डॉ. एस. आर. रंगनाथ उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार" देण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी इच्छुक असणारे ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्‍यक कागदपत्रासह दि. 25 सप्टेंबरपर्यंत तीन प्रतीत जिल्हा ग्रंथालयाकडे पाठवावे, असे आवाहन ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले.

सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, वाचन संस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.  राज्यांतील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क, ड, वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये १ लक्ष, ७५ हजार, ५० हजार व २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,  ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येइल.

 

राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, तसेच महसूल विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रु. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट देण्यात येईल.  अशी माहिती ग्रंथालय संचालक गाडेकर यांनी दिली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज