जिल्हा रानभाजी महोत्सवाला अकोलेकरांचा मोठा प्रतिसाद

 


 

 

जिल्हा रानभाजी महोत्सवाला अकोलेकरांचा मोठा प्रतिसाद

अकोला,दि १५ : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा प्रकल्प संचालक (आत्मा) व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला. त्याला अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.

रानभाज्यांबद्दलच्या स्थानिक ज्ञानाचे संकलन करणे, त्यांची सद्य:स्थिती जाणून घेणे, त्यांच्या उपयुक्ततेबाबत जाणीवजागृती करणे, संवर्धन आणि शाश्वत वापरासाठी प्रोत्साहन देणे महोत्सवाचा हेतू होता.

 

 

यावेळी रानावनातील विविध भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. करवंद.अंबाडी,करटुले, सुरण, दिंडा, केणा, टाकळा, कुडा, गुळवेल, घोळ, भुईआवळा शेवगा अशा नानाविध प्रकारच्या रानभाज्या विविध कक्षांत मांडण्यात आल्या होत्या. त्याबरोबर, प्रयोगशील शेतक-यांच्या शेतातील विविध फळांची दालनेही प्रदर्शनात होती.

या भाज्या घेण्यासाठी अकोलेकरांनी महोत्सवात गर्दी केली होती. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांच्यासह विविध अधिकारी व  मान्यवरांनीही रानभाजी महोत्सवाला भेटी दिली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज