माजी सैनिकांना वसतिगृहात नोकरीची संधी

 माजी सैनिकांना वसतिगृहात नोकरीची संधी

अकोला,दि.२१: सैनिकी मुलामुलींच्या वसतिगृहात माजी सैनिक व दिवंगत सैनिकांच्या पत्नी यांना नोकरीची संधी आहे. त्यासाठी दि. २७ ऑगस्टपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज सादर करावेत,  असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.

माजी सैनिक,दिवंगत सैनिकाच्या पत्नी या प्रवर्गातून वसतिगृहात अधिक्षक, सहायक वसतिगृह अधिक्षक, चौकीदार, माळी व सफाई कामगार या जागा भरावयाच्या आहेत. पद अशासकीय, तात्पुरत्या स्वरुपाचे व एकत्रित मानधनावर आहे. वसतिगृह अधिक्षक आणि चौकीदार हे पद निवासी आहे. इच्छुकांनी आपले अर्ज सैन्य सेवा पुस्तक,आधार कार्ड, दोन छायाचित्रे आदी कागदपत्रासह सादर करावा. अधिक माहितीसाठी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक (0724) 233377 वर संपर्क साधावा.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज