‘स्वीप’अंतर्गत गोंधळाच्या माध्यमातून मतदार जनजागृती



 

 

‘स्वीप’अंतर्गत गोंधळाच्या माध्यमातून मतदार जनजागृती

 

अकोला, दि. 20 :  अकोला पश्चिम मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव यांच्या मार्गदर्शनात आदर्श विद्यालय व खंडेलवाल ज्ञानमंदिर यांच्या सहकार्याने गोंधळ व प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

खदान येतील शासकीय गोदामात मतदान नोंदणी बुथचे उद्घाटन यावेळी श्रीमती भालेराव यांच्या हस्ते झाले. मुख्याध्यापक सारिका चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक बनून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन श्रीमती भालेराव यांनी केले. विविध लोककलावंतांनी यावेळी गोंधळाच्या माध्यमातून मतदार कर्तव्याबाबत जनजागृती केली.

समन्वयक गोपाळ सुरे यांनी विद्यार्थ्यांना मतदाराचे हक्क व कर्तव्य याबाबत माहिती दिली. वोटर हेल्पलाईनबाबतही यावेळी माहिती देण्यात आली. विकास राठोड, सुरेश पोते व हितेश राऊत यांनी परिश्रम घेतले.

 ०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज