राज्यस्तरीय कार्यक्रमाचे प्रक्षेपण; जिल्ह्यातील महिलाभगिनींची मोठी उपस्थिती महिलाभगिनींनी व्यक्त केला पैसे जमा झाल्याचा आनंद








राज्यस्तरीय कार्यक्रमाचे प्रक्षेपण;

जिल्ह्यातील महिलाभगिनींची मोठी उपस्थिती

महिलाभगिनींनी व्यक्त केला पैसे जमा झाल्याचा आनंद

अकोला, दि. 17 :  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'त जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक महिला आज पात्र ठरल्या असून, योजनेच्या पहिल्या दोन महिन्यांचा लाभ त्यांच्या खात्यात जमा होत आहे. अनेकांच्या खात्यात यापूर्वीच हा लाभ पोहोचला. त्याबद्दल अनेक महिलाभगिनींनी आज आनंद व्यक्त केला व शासनाला धन्यवाद दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात झाला. थेट प्रक्षेपण नियोजनभवनात करण्यात आले. जिल्ह्यातील अनेक महिलाभगिनींनी यावेळी उपस्थित राहून मुख्य कार्यक्रम पाहिला.  

यावेळी महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखडे आणि योजनेच्या विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे सदस्य अंबादास उमाळे, राजेश ठाकरे, विठ्ठल वाकोडे, अमोल मोहोकार, रमेश गायकवाड, अशोक परळकर, प्रकाश गीते, महेंद्र भोपळे, रवीकांत राऊत, राम आंबेकर, मनोज पारसकर, रमण जैन, उमेश भुसारी, धनंजय नेमाडे आदी उपस्थित होते.

 

या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरूपी सुरू राहील, अशी ग्वाही मान्यवरांनी आपल्या भाषणातून यावेळी देताच सर्व महिलाभगिनींनी टाळ्यांचा कडकडाट करून आनंद व्यक्त केला.

 

जिल्ह्यात योजनेचे आज रोजी 2 लक्ष 57 हजार 529 अर्जदार पात्र आहेत. तांत्रिक त्रुटी आलेल्या अर्जाची युद्धपातळीवर पूर्तता करून घेण्यात येत आहे. अधिकाधिक पात्र महिलाभगिनींना या योजनेचा लाभ मिळावा, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असे महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी सांगितले. नारी शक्ती दूत ॲपवरील पूर्ततेबाबतही माहिती त्यांनी दिली.

 

विधानसभा क्षेत्रनिहाय समितीच्या सदस्यांनीही यावेळी योजनेबाबत मनोगत व्यक्त केले. प्रारंभी त्यांचे स्वागत श्री. पुसदकर यांच्या हस्ते करण्यात आले.

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज