कौशल्यप्राप्त उमेदवारांच्या डेटाबेसमध्ये आता पारंपरिक व्यावसायिकांचा समावेश

  

कौशल्यप्राप्त उमेदवारांच्या डेटाबेसमध्ये

आता पारंपरिक व्यावसायिकांचा समावेश

 

जिल्ह्यातील पारंपरिक व्यावसायिकांनी नोंदणी करावी

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

अकोलादि. 8 :  कुशल युवकांना स्वयंरोजगार व नागरिकांना अत्यावश्यक सेवांसाठी मनुष्यबळ मिळावे यासाठी कौशल्यप्राप्त उमेदवारांचा डेटाबेस जिल्हा कौशल्य विकास विभागाकडून तयार होत आहे. त्यात आता पारंपरिक व्यावसायिकांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पारंपरिक व्यावसायिकांनी डेटाबेसमध्ये समावेशासाठी नोंदणी करावीअसे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. 

 

जिल्ह्यातील कौशल्यप्राप्त उमेदवारांचा डेटाबेस तयार करून तो ऑनलाईन करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या दैनंदिन अत्यावश्यक सेवांसाठी विविध व्यवसाय करणा-या कुशल उमेदवारांची ऑनलाईन माहिती मिळून इलेक्ट्रिशियनप्लम्बरए.सी. टेक्निशियनवाहनचालक आदी आवश्यक मनुष्यबळ मिळणार आहे. त्याचप्रमाणेकुशल उमेदवारांना याद्वारे रोजगारही प्राप्त होणार आहे. त्यात आता पारंपरिक व्यावसायिकांचाही समावेश करण्यात आला आहे.

पारंपरिक व्यावसायिकांचा समावेश केल्याने हा डेटाबेस व्यापक होणार आहे. सुतार, न्हावी, लोहार, धोबी यासारखे पारंपरिक व्यवसाय करणा-या व्यक्तींची माहिती नागरिकांना मिळून त्यांना आवश्यक सेवा मिळवता येणार आहेत.

 

 

 कशी कराल नोंदणी ?

स्वयंरोजगार करणा-या युवकांनी किंवा पारंपरिक व्यावसायिकांनी या डेटाबेसमध्ये आपले नाव समाविष्ट होण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा. नोंदणी करताना  

उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात येईल व इच्छूक उमेदवारांकडून स्वयंघोषणापत्र भरून घेण्यात येईल.

 

 

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. (संपर्कासाठी दूरध्वनी : (0724) 2433849, भ्रमणध्वनी :  9665775778)

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ