महिला सन्मान बचतपत्र योजनेचा लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

 

 

 महिला सन्मान बचतपत्र योजनेचा लाभ

घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन

         अकोला, दि. २८ :  महिला सशक्तीकरणासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना लागू असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवर डाक अधिक्षक गणेश बा. आंभोरे यांनी केले आहे.

        या योजनेमार्फत महिला खातेदार स्वतःसाठी किंवा पालक आपल्या अल्पवयीन मुलीच्या नावे कमीत कमी रू. 1 हजार रू. ते जास्तीत जास्त रू. 2 लाख जमा करून वार्षिक 7.5 टक्के त्रैमासिक चक्रवाढ पद्धतीने व्याज मिळवू शकतात. त्यासाठी खातेदाराला आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, 2 पासपोर्ट साईज फोटो आदी कागदपत्रे सादर करावे लागतात. खातेदार दि. 31 मार्च 2025 पर्यंत दोन खात्यांमध्ये 3 महिन्यांचे अंतर ठेवून खाते काढू शकतो.

        महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व डाक कार्यालयात नारी शक्ती महिला बचतपत्र अभियानही राबविण्यात येत आहे.

        अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील सर्व महिलांनी महिला सन्मान बचतपत्र योजनेत सहभागी होण्यासाठी जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

 ०००

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ