मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण; जिल्ह्यात १५ मतदान केंद्रांची वाढ विविध कार्यालये व संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध

 

मतदार केंद्राचे सुसूत्रीकरण; जिल्ह्यात १५ मतदान केंद्रांची वाढ

विविध कार्यालये व संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध

अकोला, दि. २८ : छायाचित्र मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाच्या प्रस्तावाला भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात १५ मतदान केंद्रे वाढली असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या एकूण १ हजार ७१९ झाली आहे.

जिल्ह्यात यापूर्वी १ हजार ७०४ मतदान केंद्रे होती. पुनरीक्षण पूर्व उपक्रमात मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करताना विविध प्रशासकीय कारणास्तव १५ केंद्रांची वाढ प्रस्तावित करण्यात आली. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

सर्व मतदान केंद्रांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदमी कार्यालये, तहसील कार्यालये, दुय्यम निबंधक कार्यालये, पोलीस ठाणे, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती कार्यालये, गटविकास अधिका-यांमार्फत सर्व ग्रामपंचायती आदी ठिकाणी नागरिकांना अवलोकनार्थ प्रसिद्ध करण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांनादेखील यादीची इंग्रजी व मराठी प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही यादी जिल्हा प्रशासनाच्या www.akola.nic.in  या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नागरिकांनी यादीचे अवलोकन करून मतदान केंद्रांचा तपशील तपासून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ